आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - राम भंडारे या कामगाराचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिल्यामुळे आणि पोलिसांशी हमरी-तुमरी झाल्यामुळे माजी आमदार आडम मास्तर यांच्यासह सातजणांना सदर बझार पोलिसांनी बुधवारी सकाळी नऊच्या सुमाराला ताब्यात घेऊन अटक केली. सायंकाळी पोलिसांनी सर्वांची जामिनावर मुक्तता केली.
मंगळवारी सायंकाळी सिटीबसखाली सापडून मृत्यू झालेल्या भंडारे यांच्या मुलाला महापालिकेत नोकरीत सामावून घेण्यासाठी आडम मास्तरसह सर्वपक्षीय नेत्यांनी मंगळवारी सायंकाळी महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांना विनंती केली होती. रात्री दहाच्या सुमारालाच महापालिका प्रशासनाने एक पत्र तयार करून पोलिसांना आणि नातेवाइकांना दाखविले. दरम्यान, आज सकाळी नऊच्या सुमाराला आडम मास्तर व अन्य कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी ‘कायदा व सुव्यवस्था’ बिघडू नये म्हणून आडम मास्तरसह सातजणांना अटक केली. शासकीय रुग्णालयात गोंधळ सुरू असताना पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक आयुक्त सी. आर. रोडे, कमांडो पोलिस पथक तैनात होते. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. महापालिकेत भंडारे यांच्या मुलाला घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे.
नरसय्या आडम, नगरेसवक शिवानंद पाटील, माशप्पा विटे, म. युसूफ श्ेाख, राजू म्हेत्रे, नरसिंग जंगम, अंजू म्हेत्रे यांच्याविरुद्ध कलम 37-2 प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.