आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५ पेक्षा कमी जागा घेणार नाही; भाजप‑सेनेने थोडा त्याग करावा - खासदार आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महायुतीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी (अ)(आरपीआय) २० जागा मागितल्या आहेत. किमान १५ जागांवर समझोता होईल, अशी आशा आहे. त्यापेक्षा कमी जागा घेणार नाही. ही ठाम भूमिका असल्याचे पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी येथे सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘आरपीआय’ची मते निर्णायक ठरू शकतील. त्यामुळे भाजप शिवसेनेने आपल्या काही जागांचा त्याग करावा, असेही त्यांनी सूचवले.
एका आंदोलनासाठी ते येथे आले होते, त्यावेळीते बोलत होते. सेना-भाजपकडे प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार राज्यात पुढील १० ते १५ वर्षे सत्तेवर येणार नाही. त्यामुळे आघाडीतून आउटगोइंग तर महायुतीकडे इनकमिंग चालू आहे.
मोहोळमधून राजा सरवदे
मोहोळच्याराखीव जागेसाठी राज सरवदे यांना उमदेवारी देण्यात येणार असल्याचे संकेतही रामदास आठवले यांनी दिले. जागा सोलापूरची असल्याने सोलापूरचाच उमदेवार असणार आहे. तसेच यासाठी इच्छुक जागासाठी अर्ज ही मागवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींचा चहा!
रिपब्लिकनपार्टी ऑफ इंडिया (अ)च्या वतीने भूमी सुधारणेच्या मागणीवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. त्याचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी मंचावर बसून अध्यक्ष खासदार रामदास आठवले चहाचा आस्वाद घेत शिणवटा घालवत होते. यावेळी उपस्थितांना लोकसभा िनवडणुकीतील नरेंद्र मोदींच्या चहा पुराणाची आठवण झाली.