आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawle Comment On Raj Thackeray In Solapur

राज, शिवसेनेत जा, कार्याध्यक्षपद देण्यासाठी प्रयत्न करू - रामदास आठवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उद्धव ठाकरे यांनी एक हात पुढे केलाय. राज यांनी याला प्रतिसाद द्यावा. पण, महायुतीत येण्यापेक्षा त्यांनी थेट शिवसेनेतच जावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा दिला. ते रविवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेत कार्याध्यक्षपद रिकामेच आहे. ते राज यांना मिळावे यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीसुद्धा रिपाइंच्या अध्यक्षांनी दिली. राज ठाकरे यांच्या प्रवेशाने शिवसेनेला उभारी येईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली. विधानसभेसाठी जागावाटपाची चर्चा पुढील महिन्यात सुरू होणार आहे. महायुतीतल्या घटकपक्षाच्या नात्याने आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाइं 30 ते 35 जागा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय लोकसभेसाठी 3 ते 4 जागांची मागणी असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

आरक्षणासाठी, चलो दिल्ली!
खासगी क्षेत्रात आरक्षण द्यावे, पदोन्नतीत आरक्षणाचा कायदा करावा, दलित आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता 75 टक्के आरक्षण द्यावे, बेरोजगारांना पाच हजार रुपये भत्ता द्यावा यासह इतर मागण्यांसाठी 13 मार्चला संसदेवर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

तर माढय़ातून लढेन...
सुप्रिया सुळे यांची जागा आपल्याला तीन वर्षासाठी देण्याची तयारी शरद पवार यांनी दाखवली. पण, महायुतीत आल्यामुळे ती नाकारली, असा गौप्यस्फोट आठवले यांनी केला. शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक माढय़ातून लढवणार नसतील तर तिथून उभे राहण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.