सोलापूर - आमची उडवली टिंगल त्यांचे निवडून आले सिंगल, अशा शब्दांत आठवले यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. उद्धव आणि राज यांनी आता एकत्र येऊ नये. निवडणुकीपूर्वी आले असते तर ते योग्य झाले असते. आता सेनेला त्याचा काहीच फायदा नाही. ताकद नसतानाही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याची भाषा केली होती, असा टोलाही हाणला.
२८रोजी मोर्चा
मुंबईतल्या इंदू मिल येथे स्मारक उभारण्यासाठी आणि दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने २८ रोजी मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
सोलापूर मतदारांनीकॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप - शिवसेनेला मते दिली आहेत. त्यामुळे सत्तेत वर्षे टिकायचे असेल तर भाजप आणि सेनेने ताठर भूमिका घेता समंजसपणे एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नगर जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त दलित कुटुंबीयांचे सांत्वन करून येताना त्यांनी सोलापुरात पत्रपरिषद घेतली.
१.भाजपने राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केल्यास भाजपला भविष्यात अडचणी येतील. प्रतिमेला धक्का पोहोचेल. त्यामुळे भाजप कधीच राष्ट्रवादीसोबत जाणार नाही.
२. आठ जागा लढविल्या. त्यापैकी सहा ठिकाणी सेना जिंकली. आमची मते सेना भाजपलाच मिळाली, याचे उदाहरण सोलापुरातील शिंदे यांच्या पराभवाचे आहे.
४. येणाऱ्या दिवसात स्लम एरिया प्रोटॅक्ट कायदा, मराठा आरक्षण, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी प्रश्न हाताळून सर्व समाजाला सोबत घेऊन पक्ष व्यापक करणार आहे.