आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athwale, Patil Critised Eachother On Natyasammelan

नाट्यसंमेलनात रंगली रामदास आठवले, हर्षवर्धन पाटलांची टोलेबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - उद्घाटन सोहळ्यात राज्यसभेचे नवनियुक्त सदस्य रामदास आठवले आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची जबरदस्त टोलेबाजी झाली. आठवलेंनी नेहमीप्रमाणे यमक जुळवून कविता सादर करून हशा पिकवला. संमेलनासाठी मिळणारी 25 लाखांची मदत तुटपुंजी आहे. ती एक कोटी करावी, कलावंतांचे मानधन किमान 15 हजार असावे, अशा अपेक्षा व्यक्त करताना आठवलेंनी महायुतीची सत्ता आल्यानंतर ते देणारच आहोत. तीन-चार महिन्यांचाच प्रश्न असल्याचा टोला काँग्रेस नेत्यांना लगावला.
या विधानाचा समाचार घेत पाटील म्हणाले, ‘तुमचे इचलकरंजीचे भाषण मी ऐकले. आसूडही मी पाहिले; परंतु त्याला कुठलीच ‘वादी’ नव्हती. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षाचे काम करत राहा. कलावंतांसाठी आम्ही सक्षम आहोत.’
आठवलेंची कविता
तुम्ही आलेले आहात पंढरीच्या वाळवंटात,
त्यामुळे सापडणार नाही, कुठल्या संकटात .
मीही खासदार होतो या वाळवंटात,
तेव्हा नव्हतो कुठल्याही संकटात.
जेव्हा गेलो शिर्डीच्या वाळवंटात,
तेव्हा सापडलो पराभवाच्या संकटात.
उपस्थित रंगकर्मी कलावंत
मधू कांबीकर, रिमा लागू, अर्चना नेवरेकर, प्रदीप कबरे, अनिल गवस, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, अमृता सुभाष, अशोक शिंदे, अदिती सारंगधर, किशोर कदम (सौमित्र), लीलाधर कांबळी, वि.भा. देशपांडे, रमेश भाटकर, अरुण नलावडे, विजय कदम, चंद्रकांत कुलक र्णी, लालन सारंग, डॉ. गिरीश ओक.
राजकीय मंडळीही हजर
स्वागताध्यक्ष आमदार भारत भालके, सहकार आणि विधिमंडळ कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, खासदार रामदास आठवले, आमदार प्रणिती शिंदे, हनुमंत डोळस, उल्हास पवार, पंढरपूरच्या नगराध्यक्षा उज्‍जवला भालेराव, उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे, वसंतराव काळे कारखान्याचे कल्याणराव काळे.