आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Kadam Election Rally At Solapur,latest News In Divya Marathi

पंधराशे कोटी आले कोठून? कदम यांचे सभेतील फटकारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आमदारप्रणिती शिंदे विकासकामांसाठी १५०० कोटी रुपये खर्च केल्याचे सांगतात. इतका खर्च करूनही शहराला पुरेशी वीज आणि पाणी का नाही?’, असा सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बुधवारी येथे केला.
25 वर्षांपासून आमदार असून आमदाराला मिळणारा विकास निधी आपल्याला माहीत आहे. शिंदे यांनी इतका मोठा निधी कोठून आणला? अशी विचारणा करत त्यांनी सेनेचे सरकार आल्यास याची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले.
शहर मध्य मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारासाठी सायंकाळी साईबाबा चौक येथे सभा झाली. तीत ते बोलत होते. आमदार शिंदे यांच्यावर त्यांनी टीकेचा भडिमार केला. शिंदे यांनी जनतेची फसवणूक केली असून मते मागण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे सांगितले. पाणी देतो असे सांगून पाणी दिले नाही. आता हीच जनता निवडणुकीत तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असेही कदम म्हणाले. मंचावर जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे,जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, उमेदवार महेश कोठे, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड, विष्णू कारमपुरी, प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.

मोदींचे वागणे लाजिरवाणे
भाजपवरहल्लाबोल करत कदम पंतप्रधान मोदींवरही चांगलेच बरसले. ते म्हणाले, पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असताना देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात मते मागत फिरत आहेत. त्यांच्या या वागण्याची लाज वाटते. सेनेचा आधार घेत मोठे झाले आता ते आता सेनेच्याच मुळावर उठले आहेत.
एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांना जर किल्ल्यावर पाठवले आणि यांच्या हातात ढाल तलवारी दिल्या तर खडसे यांना नीट चालता येणार नाही आणि फडवणीस यांची पॅन्ट पिवळी होईल.