आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramhari Roopanwar News In Marathi, Divya Marathi, MLA, Congress

रामहरी रुपनवर यांच्या आमदारपदी नियुक्ती, कॉंग्रेसने केली नव्या समीकरणाची आखणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - माजी जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. रामहरी रुपनवर यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदी वर्णी लागल्याने धनगर समाजाला न्याय देत काँग्रेसने मतांचे समीकरणही जुळविण्याचा सुवर्णमध्य साधला. माळशिरस तालुक्याला आणखी एक आमदार लाभला.

एकशिव (ता. माळशिरस) येथील रहिवासी असलेले अँड. रामहरी रुपनवर 1990 पासून राजकारणात आहेत. एकशिव सेवा सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 1997 ते 2007 या दहा वर्षाच्या काळात ते फोंडशिरस या जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपच्या वतीने जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. जिल्हा परिषदेतील भाजप नेते, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आदी पदे अँड. रुपनवर यांनी भूषवली आहेत. माळशिरस तालुक्यात मोहिते विरोधी गटातील प्रमुख नेत्यांमध्ये अँड. रामहरी रुपनवर यांचे नाव होते. आता या नव्या निवडीने मोहिते गटाशी त्यांचे सूत जुळले आहे. युती शासनाच्या काळात 3 वष्रे त्यांनी शेती महामंडळाचे संचालकपदही भूषवले आहे. भाजपमधील गटबाजीला कंटाळून त्यांनी 2004 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना काँग्रेसचे जिल्हा संघटक हे पद देण्यात आले होते. त्यानंतर 2007 मध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव झाले.
ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषदेपर्यंत 20 वष्रे काम पाहिले आहे. त्यामुळे ग्रामीण व्यवस्थेची नाडी मला ठाऊक आहे. अँड. रामहरी रुपनवर