आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 दिवसांत 3 टन खजुराची उलाढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रमजान महिन्याच्या पहिल्या पंचवीस दिवसांत शहरात सुमारे तीन टन खजुराची उलाढाल झाली. खजूर ग्रहण करून रोजा सोडण्याची प्रथा मुस्लिम समाजात आहे. गुणकारी आणि आरोग्यदायी खजूरास रमजान महिन्यात मोठी मागणी असते असे खजुराचे ठोक व्यापारी रिजवान मुल्ला यांनी सांगितले.

शहरात खजुराचे सहा ते सात होलसेल व्यापारी आहेत. त्याशिवाय पंजाब तालीम, समाचार चौक, भुसार गल्ली, भवानी पेठ, विजापूर वेस, बेगम पेठ, पाच्छा पेठ, शास्त्री नगर, नई जिंदगी, आसरा येथे खजुराची विक्री मोठय़ा प्रमाणात होते. शहरातील ठोक व किरकोळ व्यापार्‍यांकडून सुमारे तीन टन खजुराची विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त केला.
खजुराचे प्रकार आणि दर (प्रति किलो)
अज्वा-3000, कलमी-1000, खुर्दी-1000, मरीयम-600, बरारी-250 ते 600, किमीया-300, ओमानी-280, मिस्री-280, डेट्स-200, सन फ्रुट-600, प्रिन्स-600, अलबेला- 500, ब्लॅक फुट्र-200, मुमताज-200 रुपये प्रति कि लो विकले जात आहेत. हे प्रकार बॉक्समधील आहेत. खुले खजुर- हारमोनियम-280, सनसिड्स-250, एनर्जी-280, ग्रीन हार्मोनियम- 350, मरियम-600, मब्रुक-300, तैमुर-300, कौसर-260, ईराणी-100, कबकब-120 रुपये . इराणी खजुराला जास्त मागणी आहे.