आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्टिपर्पज ‘मीना बाजार’ वाढवणार सौंदर्यवतींचा बहार;

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रमजान सण आला की सोलापूरच्या मुस्लिम सौंदर्यवतींना ओढ लागते ती ‘मीना बाजार’ची. गेल्या 50 वर्षांपासून भरत असलेल्या या बाजारात एकाच ठिकाणी वैविध्यपूर्ण प्रसाधने, खाद्यपदार्थ, कपडे आणि नावीन्यपूर्ण वस्तू मिळतात. त्याची रौनक ही वर्षागणिक वाढतच आहे. बेगम पेठ पोलिस चौकी ते विजापूर वेस चौकापर्यंत हा बाजार भरतो. लखनौ, म्हैसूर, दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, नांदेड, परभणी आदी ठिकाणांहून स्टॉलधारक येतात.स्टॉल उभारणीचे काम सध्या सुरु आहे.

काय मिळते इथे

शिरकुम्र्याचा सुका मेवा, धार्मिक ग्रंथ, महिलांची उच्च दर्जाची सौंदर्यप्रसाधाने, विविध प्रकारचे बुरखे, कपडे, अत्तरांचे प्रकार, काचेच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, जुन्या पितळी व लाकडी वस्तू, खाद्यपदार्थ, दागिने अशा अनेक वस्तू आणि पदार्थ येथे मिळतात.

मीना बाजारात खरेदीचा आनंद वेगळा

मीना बाजारातून आपल्या आवडत्या सणासाठी खरेदी करण्याचा आनंद वेगळाच असतो. लहानपणापासूनची मीना बाजारची प्रतिमा ही जशीच्या तशी डोळ्यांत साठलेली आहे. त्यात होत असलेले नवनवे बदल हवेहवेसे वाटणारे आहेत. मुमताज मटके, गिर्‍हाईक

सौंदर्यवतींसाठी पर्वणी
विविध राज्यांतील बुरख्यांचे कपडे, रेडिमेड बुरख्यांचे विविध प्रकार, मेहंदी ते मस्करा, अत्तर, मेकअपचे कीट, दागिने मिळतात. महागड्या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने महिलांचा आनंद द्विगुणित होतो.

लहानपणापासून बाजारात जाऊन खरेदी करण्याची सवय आहे. अम्मी आणि अब्बा जेव्हा तिथे न्यायचे तेव्हाच जायला मिळायचे. खाऊ अन् कपडे हे आमचे आवडीचे विषय होते, ते मिळण्याचे ठिकाण म्हणून आम्ही मीना बाजारवर खूप प्रेम करायचो. शाबिरा शेख, गिर्‍हाईक