आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या आमिषाने बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गुंगीचे औषध देऊन एका तरुणीला गोव्याला पळवून नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुख्य संशयित मझरअहमद फारूख माडीवाले गायब असून त्याच्या भाऊ अझरअहमद फारूख माडीवाले (वय 21, रा. माणिक चौक) याला शनिवारी अटक करण्यात आली. 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. संशयिताला मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मझरची पीडित तरुणीशी ओळख होती. लग्नाचे आमिष दाखवत त्याने 28 जूनला तिला मोटारसायकलरून एका ठिकाणी आणले. तेथे गुंगीचे औषध टाकून आईस्क्रीम आणि बटाटा पॅटीस खायला दिले. त्यानंतर तिला कारमधून गोव्यास नेले.
तेथील बागा ब्रीज येथे नऊ दिवस डांबून ठेवून बलात्कार केला. त्यानंतर सोलापुरातील लकी चौकातील एका लॉजमध्ये आणून बलात्कार केला. ही बाब कुणाला सांगू नको, म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. अंगावर सिगारेटचे चटकेही दिले. 28 जूनला तो ‘त्या’ पीडित तरुणीला पळवून नेला. या प्रकरणी मदत केल्याप्रकरणी अझरला अटक झाली आहे. मझर याचा विवाह दहा जून 2012 रोजी झाला होता. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एम. वाय. डांगे यांनी दिली. संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती र्शी. डांगे यांनी दिली.