आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ: मंगळवेढ्यात आढळला मार्बल्ड बलून बेडूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा- शहरापासून दोन कि. मी. अंतरावर असणाऱ्या विठ्ठलनगर जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात "मार्बल्ड बलून' हा दुर्मिळ जातीचा बेडूक आढळला आहे. हा बेडूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठलनगर येथे शुक्रवारी जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयाचा शोषखड्डा खोदण्याचे काम सुरू असताना मजुरांना हा बेडूक दिसला. हा बेडूक नेहमीच्या बेडकापेक्षा वेगळा फुगीर असल्याचे दिसून आले. शाळेतील शिक्षक मंगेश मोरे यांनी इंटरनेटद्वारे माहिती घेतली असता हा बेडूक मार्बल्ड बलून जातीचा असल्याचे दिसून आले.
या बेडकाचा पावसाळा हा विणीची हंगाम असून तो प्रामुख्याने मध्यप्रदेश, आसाम, बंगाल, ओडिसा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, नेपाळ, बांगलादेश या भागात आढळून येतो. हा दुर्मिळ असा उभयचर प्राणी असून त्याच्यावर अधिक संशोधन झाल्यास भूगर्भातील पाण्याचा शोध घेणे सुकर होईल, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांतून व्यक्त केला जात आहे.

शिरूर येथे ही आढळला : शिरूर(जि. बीड) येथे ही मागील महिन्यात मार्बल्ड बलून फ्रॉग हा बेडूक आढळला होता.
नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत
नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत अतिदुर्मिळ म्हणून मार्बल्ड बलून बेडकाचीची नोंद आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड डॉट बुकमध्ये त्याची संकटग्रस्त म्हणून नोंद आहे. या बेडकाचा आकार अंदाजे ५५ मि.मी. असून तोंडाचा भाग आखूड गोलाकार तसेच चारीही पाय आखूड आहेत. या जातीच्या बेडकाचे पोट फुगीर असल्याने आकार गारगोटीसारखा दिसतो. अंगावर गडद तपकिरी पिवळसर रंगाची नक्षी पोटाचा खालचा भाग पांढरा निळसर आहे.
- शौचालयाची खोदाई सुरू असताना हा दुर्मिळ बेडूक सापडला आहे. त्याला वनसंरक्षकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सध्या त्याला विहिरीत सोडले आहे.”
मंगेश मोरे, शिक्षक, मंगळवेढा