आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात रेशन दुकानांवर सुरू झाली धडक कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या पथकाने गुरुवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील रेशन दुकानांची तपासणी केली. तपासणीच्या भीतीने विंचूर आणि भंडारकवठे येथील दुकानदारच गायब झाले. तपासणीसाठी दफ्तरच ताब्यात न आल्याने विंचूर येथील एक तर भंडारकवठे येथील दोन अशा तीन रेशन दुकानांना सील ठोकण्यात आले. या तीनही दुकानदारांनी गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत दफ्तर न दिल्यास त्यांच्यावर शुक्रवारी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी 15 कर्मचार्‍यांसह तपासणी मोहीम हाती घेतली. विंचूर येथे रेशन दुकानदार माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे गायब झाल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. भंडारकवठे येथील रेशन दुकानदार काशिनाथ तुभ्रे व सुमित्रा बिराजदार हे दोघेही फरार झाले. येथीलच बगले यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली. कुसूर येथील रमजान नदाफ यांच्याही केरोसीन दुकानाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तलाठय़ाची नियुक्ती केली आहे, याचा अहवाल शुक्रवारी सकाळी येणार आहे.