आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गुंजावे, अन्यथा आंदोलन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित प्रत्येक महाविद्यालयाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याचे निर्देश आहेत. या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्‍या महाविद्यालयांविरोधात ‘कॉलेज बंद’ आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर युवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज सलगर यांनी दिला. आपल्या महाविद्यालयात राष्ट्रगीत म्हटले जात नसेल तर कोणत्याही विद्यार्थ्याने 9096138278 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहनही सलगर यांनी केले आहे.
काही नामांकित महाविद्यालयांतूनही राष्ट्रगीत म्हटले जात नसल्याचे दिसून आले. त्यानंतर युवक प्रतिष्ठानने राष्ट्रगीताच्या सीडी महाविद्यालयांना भेट देत राष्ट्रगीताचा उपक्रम सुरू करण्याची विनंती केली. या आवाहनाला प्रतिसाद देत दयानंद महाविद्यालयाने उपक्रम सुरू केला. मात्र, इतर ठिकाणी राष्ट्रगीत म्हटले जात नाही. जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्न 123 महाविद्यालये आहेत. महाविद्यालयीन युवकांमध्ये राष्ट्रभावना वाढीस लागावी, या हेतूने कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी गतवर्षी अकलूज येथे झालेल्या युवा महोत्सवात झालेल्या मागणीनुसार राष्ट्रगीताचा उपक्रम महाविद्यालयांतून राबविला जावा असा आदेश दिला.