आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

41 रेशन दुकानांवर दंडात्मक कारवाई; तिघांचे परवाने रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील रेशन दुकानांची तपासणी करून शहर अन्नधान्य वितरण अधिकारी संतोष भोर यांनी अनियमितता आढळल्याने 41 रेशन दुकान चालकांना पंधराशे ते तीन हजार रुपयांपर्यंतचा दंड केला आहे. शहरातील घाऊक व अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्या परवानाधारकांना समान रॉकेल कोटा वाटप पद्धती सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी पदभार घेतल्यानंतर पुरवठा खात्यात सुधारणा सुरू झाली आहे.

दंड कारवाई झालेले रेशन दुकानदार व दंडाची रक्कम याप्रमाणे : शांताबाई बाबूराव म्हमाणे- 3 हजार, पुतळाबाई रामचंद्र राजोळ -3 हजार, बाहुबली कन्झ्युर्मस को-ऑप सोसायटी -दीड हजार, आर. एस. उप्पीन -3 हजार, निरा अँन्ड पाम सोसायटी -3 हजार, अमर भीम क्रीडा मंडळ -3 हजार, जिव्हेश्वर मंडळ -दीड हजार, अंबादास सिद्राम निलवाणी- सक्त ताकीद, राजीव गांधी सर्व व्यवसायी ग्राहक संस्था -दीड हजार, सगर समाज विकास मंडळ -दीड हजार, साधना व्यवसायी ग्राहक संस्था- सक्त ताकीद, लियाकत चाँदसाो मंद्रूपकर- दीड हजार, शेळगी विविध कार्य संस्था -दीड हजार, भुवनेश्वरी महिला ग्राहक संस्था- दीड हजार, किशोर शिवराम संगमवार- सक्त ताकीद, शोभा पद्माकर महामुनी- सक्त ताकीद, हिंद युवक मंडळ -सक्त ताकीद, सौ. एल. आर. लवटे -दीड हजार, विवेकानंद कंझ्युर्मस सोसायटी -तीन हजार, भारतरत्न दलित राष्ट्रीय सेवा मंडळ- दीड हजार, जय अंबिका ग्राहक संस्था -दीड हजार, राम वडार कामगार संस्था- तीन हजार, स्वामी सर्मथ सह ग्राहक संस्था- दीड हजार, सोनाई ग्राहक संस्था -दीड हजार, स्वामी सर्मथ ग्राहक संस्था -सक्त ताकीद, ताहेर हशमोद्दिन शेख -दीड हजार, पुंडलिक सर्व व्यवसायी ग्राहक संस्था -तीन हजार, सुरेश विलासचंद शहा -दीड हजार, राजकमल कंझ्युर्मस सोसायटी लिमिटेड -दीड हजार, अण्णाराव लगमण्णा धुळराव -तीन हजार, जनसेवा सहकारी ग्राहक संस्था -दीड हजार, नरसिंह स्वामी सर्व व्यवसायी ग्राहक संस्था- दीड हजार, चंदन सर्व व्यवसायी ग्राहक संस्था -दीड हजार, शांता रेवणसिद्ध राठोड- तीन हजार, जिजाई महिला सर्व व्यवसायी ग्राहक संस्था -तीन हजार, रेणुका महिला ग्राहक संस्था -दीड हजार यांच्यावर कारवाई झाली. तर कामगार सोसायटी, सवरेदय विकास मंडळ, पंचाक्षरी महिला सर्व व्यवसायी सहकारी ग्राहक संस्था यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

रॉकेल कोट्याचे समान वाटप?
घाऊक व अर्धघाऊक विक्रेत्यांना समान कोटा वाटप करण्यात आल्याचे भोर यांनी सांगितले. वाटप असे - सिद्धेश्वर हात. सह. संस्था- 36000 लिटर, शहनाज पगडीवाले -48000, चंद्रकांत शिंदे -48030, शाह वाडीलाल जीवन -15050, स्वस्तिक कंझ्युर्मस -96000, शांतवीरप्पा बावी -84000, महाराष्ट्र ऑईल कंपनी -15050, शाह वाडीलाल जीवन -16450, सोलापूर ऑइल एजन्सी -84000, शहा वाडीलाल जीवन -1 लाख 24 हजार 500 लिटर, नितीन गायकवाड- 48000, जमीर शेख- 48000, महाराष्ट्र कंपनी -33000, इस्माईल शेख -48070, साईनाथ डिलर- 50900, सदाशिव एजन्सी -96620, सिद्राम गायवाकड- 48020, साईनाथ डीलर -93130 लिटर असा रॉकेल वाटप आहे. यात समानता कशी हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.