आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशरी कार्डधारकांना आता मिळणार धान्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्य वाटप करण्यात येत असले तरी केशरी शिधापत्रिकाधारक मात्र धान्यापासून वंचितच होते. अखेर शासनाने मे पासून जिल्ह्यातील 2 लाख 27 हजार 537 केशरी शिधापत्रिकाधारकांना (एपीएल) धान्य देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे मे महिन्यामध्ये शहर-जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांना 9.60 रुपये दराने प्रतिकार्ड पाच किलो तांदूळ आणि 7.20 रुपये दराने 10 किलो गहू मिळणार आहे. सध्या तांदूळ उपलब्ध असून गहू मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शहरातील एपीएल कार्डधारकांसाठी 984 टन गहू तर 489 टन तांदूळ आवश्यक आहे. ग्रामीणमध्ये 1,290 टन गहू तर 648 टन तांदूळ आवश्यक आहे. शासनाने अन्नसुरक्षा विधेयकानुसार बीपीएल अंतर्गत नागरिकांसाठी मंजूर असलेले धान्य दिले जात होते. यामध्ये आता 2,274 टन गहू व 1,137 टन तांदळाची भर पडली आहे. यामध्ये मे महिन्यात 1,137 टन तांदूळ उपलब्ध होत आहे.
आठ दिवसांत धान्य मिळेल
जिल्ह्यातील 2 लाख 27 हजार 537 केशरी कार्डधारकांसाठी 1 हजार 137 टन तांदूळ चालू महिन्यापासून उपलब्ध झाला आहे. एफसीआयकडून खरेदी करून आठ दिवसांमध्ये रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. रेशन दुकानात धान्य मिळाल्यानंतर लगेच वाटप सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रमेश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी.