आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरसी स्मार्ट कार्डचा मार्ग मोकळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) ऑप्टिकल मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील दोन महिन्यांपासून 12 हजाराहून अधिक आरसी स्मार्ट कार्डचे वितरण रखडले होते. ‘दिव्य मराठी’तून या विषयावर प्रकाश टाकण्यात आल्यानंतर दिल्लीहून मशिन उपलब्ध करून कार्ड देण्याचे काम सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांत 3 हजाराहून अधिक आरसी कार्ड तयार झाली आहेत. आठवडाभरात आरसी कार्ड मिळणार असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

कार्ड तयार करणार्‍या ऑप्टिकल मशिनमध्ये बिघाड झाल्याने आरसी कार्ड बनवण्याचे कामच थांबले होते. तसेच रोज र्मटर संस्थेतर्फे सोलापुरात मशिन उपलब्ध करण्याबाबतही टाळाटाळ केली जात होती.

रोज र्मटर संस्थेकडून ऑप्टिकल मशिन उपलब्ध झाले आहे. त्यांना शिल्लक कामाचा निपटारा लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले आहेत.’’ दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी