आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीनिमित्त बाहेर असणार्‍या महिला सोलापुरातही सुरक्षित नाहीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मुंबईत एका छायाचित्रकार महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नोकरी व कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणार्‍या महिला या सोलापुरातही सुरक्षित नाहीत, अशी भावना व्यक्त होत आहे. पोलिस ठाण्यात नोंद होणार्‍या घटनेतून अनेकदा हा प्रश्न चर्चेत आलेला आहे. कधी चिमुकली, तर कधी अल्पवयीन मुलगी अत्याचाराला बळी ठरल्या आहेत. असे कृत्य करणार्‍यांवर ठोस कारवाई करण्याबाबत अद्याप ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. आता महिला सुरक्षा प्रश्नावर पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेऊन संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.