आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांचे दर स्थिर, रेडिरेकनरमध्ये तेजी ; जिल्हाभर लागू वाढीव मुद्रांक शुल्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर. बांधकाम व्यवसाय सध्या स्थिर स्थितीत असला तरी मुद्रांक कार्यालयाने शहरातील खुल्या जागा घरांच्या रेडिरेकनरमधील दरांमध्ये परिसरनिहाय सरासरी प्रतिचौरस फूट १७० रुपयांची तर ग्रामीण भागात बागायत शेतजमिनीच्या दरामध्ये ११ ते ३३ टक्के वाढ केली.
सिद्धेश्वर पेठ
बाळे परिसरात पुणे-सोलापूर महामार्ग विस्तारीकरणामुळे जागा खरेदीस अधिक पसंती असल्याने २० टक्के वाढ केली. शहरात इतर ठिकाणी मात्र नैसर्गिक वाढीपेक्षा टक्के म्हणजेच सरासरी १७ टक्के वाढ झाली.
नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम दरात दुपटीने वाढ
अ,ब, दर्जाच्या नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम दरामध्ये खूप मोठी वाढ झाली. दर्जाच्या नगरपालिका क्षेत्रात आरसीसी बांधकाम दरामध्ये ८८२ रुपयांवरून थेट १८४० इतकी वाढ केली. आणि दर्जाच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये हाच दर ८३६ रुपयांवरून १६३२ रुपये करण्यात आला आहे. पक्के बांधकाम, अर्ध पक्के बांधकाम कच्चे बांधकाम दरामध्येही तिपटीने वाढ केल्याचे दिसते.

नवी पेठमध्ये सर्वाधिक तर देगावमध्ये कमी दर
शहरातीलजमिनीच्या शासकीय बाजारमूल्यामध्ये वाढ करण्यात आली. यामध्ये नवी पेठ परिसरामध्ये दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली. नवी पेठेत खुल्या जागेच्या दरामध्ये प्रति चौरस फुटामध्ये ३२६ रुपयांची तर बांधकाम दरामध्ये हजार २४८ रुपयांची वाढ करण्यात आली. सर्वात कमी वाढ देगाव परिसरात झाली आहे. खुल्या जागेच्या दरामध्ये प्रति चौरस फूट १३ रुपयांची वाढ करण्यात आली.

^आम्ही नेहरूनगर परिसरात २३०० रुपये स्क्वे.फूट दराने घरे विकतो आणि त्याठिकाणी आता शासकीय दर २६०० रुपये झाला. यामुळे ही वाढ अवास्तव वाढते. शहरामध्ये १५०० रुपयांमध्ये स्क्वे. फुटाचे बांधकाम होते. मात्र ही वाढ थेट २०४४ रुपयांवर नेली. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. सुनीलफुरडे, अध्यक्ष,क्रेडाई संघटना

वाढीव मुद्रांक शुल्क जानेवारीपासून जिल्हाभर लागू होत आहे. नगरपालिका क्षेत्रातील दरामध्ये दुप्पट तर नगरपालिका क्षेत्रामध्ये ितप्पट वाढ केली आहे. मनपा हद्दीतील बांधकाम दरामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क वाढीमुळे खुल्या जागा घरांच्या किमती किंचित वाढतील.

बाजार मूल्य प्रत्यक्षातील व्यवहार यात मोठीच तफावत
शासकीयबाजारमूल्य प्रत्यक्षात होत असलेल्या व्यवहारांची रक्कम यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचे दिसते. मुद्रांक कार्यालयाने शहरी भागात सरासरी १७ टक्के वाढ केली असली तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये १० पटीचा फरक असल्याचे दिसते. याचा फटका नागरिकांना बँककर्ज घेताना बसतो. खुली जागा वा घर खरेदी करताना अनेक ठिकाणी ऑन रक्कम द्यावी लागते.

शेतजमिनी ऊसशेतीच्या दरात विक्रमी वाढ
यंदाप्रथमच जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शासकीय बाजार मूल्य प्रस्तावांमध्ये लक्ष घातले होते. ऊस शेतीच्या दरामध्ये मोठी सुचवण्यात आली होती. ११ तालुक्यातील शेतजमिनीच्या दरामध्ये सरासरी १५ ते ६१ टक्के तर ऊस शेतीच्या दरामध्ये ११ ते ३३ टक्के वाढ करण्यात आली आहे. बिनशेती जमिनीचे दरामध्ये नैसर्गिक १३ ते १५ टक्के वाढ केली आहे.