आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड लिस्ट: नामशेष होण्याच्या यादीत माळढोकचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (आययूसीएन) नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या पक्ष्यांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात भारतातील 15 पक्ष्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात आढळणार्‍या माळढोकचा समावेश आहे. तसेच, यादीतील तीन प्रजाती पूर्वीपेक्षाही जास्त धोकादायक स्थितीत पोचल्याचा निष्कर्ष संघटनेने नोंदवला आहे.
निसर्ग व पर्यावरण संवर्धनाच्या साखळीत पक्ष्यांचा मोठा सहभाग आहे. पण, वातावरणातील बदल व अधिवासाचा होणारा नाश याचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसतोय. आंतरराष्ट्रीय संघटनेने केलेल्या निष्कर्षामध्ये चिंताजनक स्थितीतील 15 पक्ष्यांची नोंद झाली. प्रदूषणामुळे पश्चिम घाट व हिमालयाबरोबर मध्य भारतातील पानगळीच्या जंगलांना मोठा धोका निर्माण झाल्याचा फटका स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांना बसत आहे.

उपाययोजना आवश्यक
धोकादायक स्थितीत असलेल्या प्रवर्गातील पक्ष्यांच्या संरक्षणासाठी सर्वप्रथम त्यांच्या अधिवासाचे संरक्षण आवश्यक आहे. शाश्वत विकासासाठी तातडीने उपाययोजना केल्यास त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो.
- डॉ. असद रेहमानी, ज्येष्ठ संचालक, बीएनएचएस, मुंबई

हे पक्षी आहेत जास्त धोकादायक स्थितीत
नदी तिटवी
नदी सूरय
लांब शेपटीचे बदक

गिधाडांची संख्या कृत्रिम प्रजनन केंद्रामुळे वाढली
धोकादायक स्थितीतील पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी भारतामध्ये बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) संस्थेतर्फे कार्य करण्यात येते. यापूर्वी ‘आययूसीएन’ यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत गिधाडांचा समावेश चिंताग्रस्त यादीमध्ये होता. त्यांचे संरक्षण व संवर्धनाचा प्रयत्न बीएनएचएस तर्फे सुरू असून त्यास चांगले यश मिळत आहे. जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावरील गिधाडांची संख्या कृत्रिम प्रजनन केंद्रामुळे वाढली आहे.

या पक्ष्यांना आहे धोका
सायबेरियन क्रेन
चमचा बदक
सॅण्डपायपर
नॉनमायग्रेट वेटलॅण्ड
व्हाइट बिल्डे हेरॉन
गिधाड
गुलाबी डोक्याचा बदक
पांढर्‍या पाठीचा गिधाड
धाविक (कोरसर)
माळ टिटवी
हिमालयीन लहान पक्षी
बंगाली तणमोर (बेंगॉली फ्लोरिकन)
ग्रेट इंडियन बस्टर्ड (माळढोक)
फॉरेस्ट ऑलेट (रान पिंगळा)