आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथोत्सव मिरवणुकीला रात्री बारापर्यंत परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव यंदा 10 ऑगस्टला आहे. उत्सवमूर्तीची चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात येते. त्याच्या दर्शनासाठी मिरवणूक मार्गावर लाखो भाविकांची गर्दी असते. मिरवणुकीला रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी पद्मशाली प्रतिष्ठानने केली आहे. याचे निवेदन पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना देण्यात आले.
माजी आमदार नरसय्या आडम, मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे ज्येष्ठ संचालक विजय नक्का, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष अशोक इंदापुरे यांच्या शिष्टमंडळाने श्री. रासकर यांची भेट घेतली.
गृहमंत्रालयाला कळवू
ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार रात्री दहानंतर कुठल्याही मिरवणुकांना परवानगी नाही. जर द्यायची असेल तर त्याचा निर्णय गृहमंत्रालय घेते. पद्मशाली समाजबांधवांच्या भावना मंत्रालयाला कळवू.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त
दहाच्या आत मंदिरात
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रथोत्सव सकाळी लवकरच सुरू करून रात्री दहाच्या आत मंदिरात नेण्याचे नियोजन झालेले आहे. जर कुणाच्या प्रयत्नांनी रात्री बारापर्यंत परवानगी मिळाल्यास उत्तमच.’’ जनार्दन कारमपुरी, अध्यक्ष, पद्मशाली
रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी