आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटवण्याची मोहीम जारी, वाहतूक पोलिसांकडून शिवाजी चौकात पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिवाजी चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अतिक्रमण हटवणे, रिक्षा थांबा देणे याबाबत नियोजन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी पोलिस उपायुक्त अश्विनी सानप, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी शिवाजी चौक ते नवीवेस या मार्गावर पाहणी केली. या पूर्ण मार्गावर मध्यभागी दुभाजक अथवा बॅरिकेडिंग लावल्यास वाहतूक नियोजन सुरळीत होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. चौकातील वाहतूक बूथ हटवून दत्त हॉटेलच्या बाजूला लावण्यात आला आहे. त्यातून स्पीकरद्वारे सूचना दिल्यास रिक्षा, दुचाकी यांच्यावर जरब बसेल.
जीप,अ‍ॅपे रिक्षांची गर्दी मात्र हटता हटेना
मोहोळच्यादिशेने जाण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकातील पेट्रोल पंपासमोर जीप, अ‍ॅपेरिक्षा रस्त्यावरच थांबताना दिसतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. विजापूर रोड, होटगी रोडच्या दिशेने जाण्यासाठी अ‍ॅपेरिक्षा रिक्षा शेर पंजाब हॉटेलसमोर बेशिस्तपणे आडवे-तिडवे थांबतात, त्यांनाही शिस्त लावण्याची गरज आहे.