आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 वा राष्ट्रीय उत्सव : प्रजासत्ताकदिनी देशभक्तीला उधाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मेरा भारत महान’, ‘भारत माता की जय’च्या जयघोषात शनिवारी 64 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, सार्वजनिक मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजवंदनानंतर शानदार संचलन, देशभक्तिपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे देशभक्तीला उधाण आले होते.

कुचन प्रशाला

कुचन प्रशालेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सहसचिव व्यंकटेश आकेन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. याच वेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त मल्लिकार्जुन सरगम, नरसप्पा इप्पाकायल, प्राचार्या डॉ. मीरा शेंडगे आदी उपस्थित होते. अभिज भानप यांनी सूत्रसंचालन केले.

भारत विद्यालय

भारत विद्यालयामध्ये वडार समाजाचे शहराध्यक्ष सुनील साळुंके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कवायतीचे संचलन पी. के. राजेगावकर यांनी केले. आर. जी देवकर यांनी सूत्रसंचालन केले. पी. टी. फरड यांनी आभार मानले.

आदर्श मार्कंडेय प्रशाला

आदर्श मार्कंडेय प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी चापळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल घाडगे, संतोष धोत्रे आदी उपस्थित होते. या वेळी महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनिल घाडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. संगमेश्वर मुदंडे यांनी सूत्रसंचालन केले. धरेप्पा सालोटगी यांनी आभार मानले.

म्हेत्रे उर्दू प्रशाला

सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे उर्दू प्रशालेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नगरसेविका कांचना यन्नम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापिका एम. एन. शेख यांनी प्रस्तावना केली. ए. एम. मुल्ला यांनी आभार मानले.

बटरफ्लाय स्कूल

बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका अपर्णा कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आरएसपीच्या मुलांनी संचलन केले. सातवीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिडनिर्मिती करून दाखविली. पी. सी. व्हनमाने यांनी आभार मानले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

उत्कृष्ट मराठी विद्यालय

उत्कृष्ट मराठी विद्यालयात मुख्याध्यापक मैनोद्दिन इनामदार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक रेहाना शेख उपस्थित होत्या. या वेळी फिरोज पठाण, राजेंद्र कुलकर्णी, रूपाली शिंदे, अंजली कोळी यांनी मार्गदर्शन केले. विजयकुमार राजापुरे यांनी सूत्रसंचालन केले.

सोनामाता कन्या प्रशाला

सोनामाता कन्या विद्यालय येथे पाखर संकुलच्या संस्थापिका शुभांगी बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या अध्यक्षा सरोज कानडे, विनायक कुलकर्णी, मुख्याध्यापिका क्षिरसागर, कल्पना रेडेकर, पर्यवेक्षक शहा, पालक प्रतिनिधी धामणगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक जाधव यांनी केले तर आभार कवचाळे यांनी मानले.

आधार मतिमंद विद्यालय

कुंभारी येथील आधार मतिमंद निवासी विद्यालय येथे रयत शिक्षण संस्थेचे प्रा.हक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शुभांगी कलकेरी होत्या. या वेळी प्रा.राजेंद्र अलकुंटे, प्रा.घुले, जगदीश कलकेरी उपस्थित हेाते. प्रास्ताविक जगदीश कलकेरी यांनी केले तर सुत्रसंचालन सोनाली शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी सुहास अलकुंटे, तानाजी देंडे, बालाजी शेळके, देवराज देसाई, पवन शेवगार, सुशांत अलकुंटे, गड्डी, रायचूरकर आदींनी पर्शिम घेतले.

शिंगवी विद्यालय

कारंबा येथील स्नेहालय संचलित सेट रसिकलाल जेठमल शिंगवी विद्यालय येथे उद्योगपती चंद्रकांत तापडीया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रदीपकुमार शिंगवी, र्शीनिवास दायमा, अशोक चंडक, प्रमोज जैन, सुवर्णकार संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद रेवणकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक लता तोंडावळे यांनी केले.

एच.सी.सी. हायस्कूल

एच.सी.सी हायस्कूलचे चेअरमन अनिल विपत व कॅथरिन फिअरसन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सप्ताहाचे बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी रेव्हरंड अँनी, शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता उरणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

इंदिरा कन्या प्रशाला

इंदिरा कन्या प्रशालेत ध्वजवंदन झाले. या वेळी संस्थेचे सचिव जगदीश तुळजापूरकर, विश्वस्त जयंतभाई जक्कल्ल, मुख्याध्यापिका पार्वती बिराजदार उपस्थित होते.