आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Republican Party Of India Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाशक्ती जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डॉ.राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागा लढविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी दिली. दक्षिणमधून सुबोध वाघमोडे, मोहोळमधून राम गायकवाड, करमाळ्यामधून विठ्ठल गायकवाड, अक्कलकोटमधून सुधाकर घटकांबळे आदी उमेदवारांची यादी जाहीर झाली असून उर्वरित जागांची यादी २६ सप्टेंबर रोजी घोषित करणार आहे, असेही वाघमोडे म्हणाले रिपाइं, आवामी विकास पार्टी, ओबीसी एनटी ऑफ इंडिया, मायनोरिटी ऑफ इंडिया, आझाद विदर्भ सेना, रिपब्लिकन क्रांितदल आदी दहा पक्ष संघटनांनी एकत्रित येऊन महाशक्तीची स्थापना केली. महाशक्तीच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व २८८ जागा लढविणार आहे.