आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenue Administration,Latest News In Divya Marathi

महसूल प्रशासनाचे सेतू कार्यालय रविवारीही ‘हाऊसफुल्ल!’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महसूल प्रशासनाने सेतू व तहसील कार्यालयात दाखल्यासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी शनिवारी आणि रविवारी दोन्ही कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी सुरू असलेले येथील सेतू कार्यालय ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. दिवसभरात एक हजारपेक्षा अधिक दाखल्यांसाठी अर्ज आल्याची माहिती सेतू कार्यालयाकडून देण्यात आली.
अभियांत्रिकी, एमबीए व वैद्यकीय द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची अंतिम मुदत 28 जुलै होती. मात्र, यामध्ये वाढ करण्यात आल्याने सेतू कार्यालयात गर्दी दिसून आली. रविवारी दिवसभरात मराठा जातीच्या दाखल्यासाठी 344 अर्ज दाखल झाले. याशिवाय उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रिमिलेअर असे एकूण 922 अर्ज दाखल झाले. विविध दाखल्यांसाठी आलेले अर्ज सोमवारी उत्तर तहसील कार्यालयाकडे सोपवण्यात येणार आहेत. यामध्ये उत्पन्न व रहिवासी दाखले तीन दिवसांत तर जात, नॉन-क्रिमिलेअर दाखले देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.