आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा नदीपात्रातील वाळूचे, तीन टिप्पर, दुचाकी जाळली, सोलापूर जिल्ह्यात अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भीमा नदीच्या पात्रातील बोटी महसूल व पोलिसांच्या पथकाने जाळताच काही अज्ञात लोकांनी वाळू वाहतूक करणारे तीन टिप्पर व एक मोटारसायकल जाळून टाकले. कुसूर गावच्या हद्दीत ही घटना घडली. टिप्पर जाळल्याप्रकरणी मद्रुप पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाळू वाहतुकीमुळे ग्रामस्थांच्या संतापाच्या उद्रेकातून ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कुसूर येथे भीमा नदीच्या पात्रातून चोरून वाळूचा उपसा होत असल्याची माहिती प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे यांना मिळाली होती. त्यावरून शुक्रवारी मध्यरात्री तहसीलदार बाबूराव पवार, मंडल अधिकारी, तलाठी व पोलिसांच्या पथकाने वडापूरमार्गे कुसूर गाव गाठले. त्या वेळी कुलकर्णी यांच्या शेतात त्यांना तीन टिप्पर दिसले. नदीतून वाळूचा उपसा करणाऱ्या बोटीचा आवाजही येत होता. त्यामुळे हे पथक ितकडे गेले. पथकाला पाहून बोटचालकाने पळ काढला. मात्र पथकाने पाइप कापून बोट पेटवून दिली. दरम्यान, कारवाई केल्याचे समजताच काही ग्रामस्थही घटनास्थळी आले. पथक नदीपात्राकडे असताना अज्ञात व्यक्तींनी वाळू कंत्राटदारांचे तीन ट‍िप्पर पेटवून दिले. त्यापूर्वीच पथकाच्या भीतीने टिप्परचालक पळून गेले होते. टिप्परच्या बाजूला लावलेली मोटारसायकलही खाक झाली. जाळपोळ सुरू होताच प्रांतािधकारी पाटोळे व तहसीलदार पवार यांनी मंद्रूप पोलिसांना बोलावले. मात्र पोलिस घटनास्थळी येईपर्यंत तिन्ही टिप्पर जळाले होते. महसूल पथकाची कारवाई रविवारी दुपारपर्यंत सुरू होती. जळालेल्या बोटीचे पाइप जप्त करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या नेत्याचे टिप्परवर स्टिकर
अज्ञात लोकांनी लावलेल्या आगीत एम एच १३ ए एक्स २९८१, एम एच १३ ए एक्स ३५६७, एम एच १२ ई क्यू ६०९ हे तीन टिप्पर जळाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर मोटारसायकल पूर्ण जळाल्याने क्रमांकही दिसत नव्हता. जळालेल्या टिप्परच्या काचेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश गादेकर यांच्या छायाचित्राचे स्टिकर आहे.
वाळू चोरांना हादरा
या घटनेने कुसूर येथे वाळू चोरी सुरू असल्याचे उघड झाले. महसूलच्या धाडसी कारवाईची आणि अज्ञात ग्रामस्थांच्या उद्रेकाचा वाळू चोरांना मोठा हादरा बसला आहे. रविवारी दिवसभर मंद्रूप परिसरात त्याची चर्चा होती.