आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी रिव्हॉल्वर, काडतुसासह परमेश्वर पिंपरीचा तरुण अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गावठी रिव्हॉल्वर, एक जिवंत काडतूस घेऊन फिरणार्‍या तरुणाला भय्या चौकात अटक करण्यात आली. बालाजी बाबूराव रोमन (वय २२, रा. परमेश्वर पिंपरी, ता. मोहोळ) असे तरुणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी चारच्या सुमाराला ही कारवाई झाली.

बालाजी हा बीसीए पदवधीर असून तो काही काळ पुण्यात कामाला होता. कालांतराने गावाकडे शेती असल्यामुळे इथेच काही दिवसांपासून काम करीत होता. गावठी कट्टा घेऊन तो सोलापुरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, अल्ताफ शेख, हिंदूराव पोळ, अप्पा पवार, सुरेश जमादार, राजकुमार तोळणुरे, अनिल जाधव या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. गावठी कट्टा बालाजीने पुण्यात घेतला होता. त्याने कशासाठी घेतला, जवळ का बाळगत होता, सोलापुरात कशासाठी आला होता या बाबींचा उलगडा तपासात होणार असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.