आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक व पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुणे विभागाच्या शिक्षण व पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान झाले. शिक्षक व पदवीधरांनी मतदानास प्रचंड प्रतिसाद देऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानासाठी केंद्रावर गर्दी केली होती. यासाठी कार्यकर्ते मतदारांना आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. शुक्रवारी मतदानासाठी 67 हजार 892 पदवीधर मतदार तर 12 हजार 837 शिक्षक मतदारांनी 109 तर शिक्षक व पदवीधरांनी 81 मतदान केंद्रांवर मतदान केले.
शहरामध्ये पदवीधरांसाठी सेंट जोसफ प्राथमिक शाळा, हिंदुस्थान कॉन्व्हेंट स्कूल, नूतन मराठी विद्यालय , सिध्देश्वर प्रशाला, सिध्देश्वर प्राथमिक शाळा येथे मतदान झाले. शिक्षक मतदारांसाठी हरिभाई देवकरण प्रशालेत मतदान केले. मतदारांना मतदार केंद्रावर आणण्यासाठी विशेष सोयही दिवसभर करण्यात आली होती. शिक्षक व पदवीधर कार्यकर्त्यांनी प्रचाराची पूर्वतयारी केली असल्यामुळे मतदानास गर्दी होती.
दुपारी मतदान वाढले
शिक्षकांना अर्धा दिवस काम असल्याने सकाळी थोडी गर्दी कमी होती. दुपारी मतदानाचा जोर वाढला. शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. शहर , उत्तर व दक्षिण आदी भागांतील शिक्षक व पदवीधरांनी मतदान केले.

याद्यांचे मॅनेजमेंट
शिक्षक व पदवीधरांच्या याद्यांच्या मॅनेजमेंटसाठी प्रत्येक केद्रांच्या बाहेर स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्येक उमेदवाराला लॅपटॉपवर नाव बघून त्वरित मतदानासाठी पाठविण्यासाठी येत होते. प्रशालेच्या बाहेर नाव बघण्यासाठी जत्रेसारखी गर्दी होती.