आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक इमारतीवर महापालिकेचा हातोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कन्ना चौक येथील विठ्ठल कन्ना यांची जुनी आणि जीर्ण झालेली इमारत मंगळवारी दुपारी महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने पाडली. महापालिकेने वारंवार नोटिसा बजावूनसुद्धा जागामालकांनी ती इमारत न पाडल्यामुळे महापालिकेने इमारत पाडण्याची कारवाई केली. पाडकामाचा हा खर्च त्या घरमालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. शहरातील धोकादायक इमारती, अतिरिक्त वाढीव बांधकाम आणि पार्किंगच्या जागेवर झालेले बांधकाम आदींवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानुसार मंगळवारी ही कारवाई झाली. आणि दुपारी दोन वाजता संपली. या वेळी अभियंता डी. आर. भादुले, उपअभियंता आर. डी. जाधव, एच. ए. आदलिंगे, जहांगीर विजापुरे, वसंत पवार, नजीर शेख यांच्यासह अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचा कर्मचारी वर्ग आणि पोलिसांचा ताफा उपस्थित होता.