आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • River Complaining , Thirst .. Gurdian Minister Ask To River

नदीने तक्रार केली, तहान लागली.. पालकमंत्री नदीला विचारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दुष्काळावरच्या उपाययोजना सांगून झाल्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे रविवारी भावुक झाले. म्हणाले, ‘‘कुठला अवकाळी पाऊस आला तर दिलासा मिळेल. जर जून, जुलैमध्येही पाऊस झाला नाही तर मात्र उजनीकडेच आशेने पाहावे लागेल. सध्या तरी नदीनेच माझ्याकडे तक्रार केली. तहान लागली म्हणून.. मीच तिला विचारतोय, आता मी काय करू..?’’

श्री. ढोबळे यांनी रविवारी सकाळपासून शासकीय विर्शामगृहात वाड्या-वस्त्यांवरील शेतकर्‍यांशी बोलत त्यांच्या मागण्या नोंदवून घेतल्या. त्यानंतर दुपारी पत्रकारांना त्याची माहिती दिली. दुष्काळासंदर्भात केलेल्या विविध उपायांची त्यांनी माहिती दिली. तलावांतील पाणी आटत चालले आहे. नद्यांतील पाण्याचा काटकसरीने वापर सुरू आहे. 25 कोटी रुपयांचा निधी खर्चासाठी उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.


हे आहेत उपाय
0फळबागा जगवण्यासाठी शासन प्रती हेक्टर 30 हजार रुपयांचे अनुदान देणार
0चारा छावणीतील प्रती जनावराचा खर्च 60 रुपयांवरून 70 रुपये करण्यात यावा
0प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आराखडा
0गरजेच्या ठिकाणी हातपंप, बोअर मारून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू


‘आलमट्टी’चे गणित जमले नाही
कर्नाटकातील आलमट्टी धरणातून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न झाले. दोन्ही राज्यांकडून पाणी देव-घेवबाबत चर्चा झाली. परंतु त्याचे गणित काही जमले नाही. कारण दोन्हीतील अंतर साडेतीनशे किलोमीटरचे. आलमट्टीतून 5 टीएमसी पाणी सोडल्यानंतर इच्छितस्थळी मिळणारे पाणी फक्त अर्धा टीएमसी. इकडून देण्यात येणार्‍या पाण्याचेही तेच गणित. त्यामुळे त्याची चर्चा आता थांबली असल्याचे श्री. ढोबळे यांनी जाहीर केले.