आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंभुर्णीजवळ अपघात; मामा - भाचा ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेंभुर्णी- समोरून टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास येथून जवळच असलेल्या हॉटेल जंजिराजवळ हा अपघात घडला. सचिन बापूराव पवार (वय 18) व दिग्विजय दीपक ढेकणे (वय 8, हल्ली रा. काळेवाडी, पुणे) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. सचिन व दिग्विजय हे दोघे नात्याने मामा-भाचा आहेत. दीपावली सणासाठी ते पुण्याहून सोलापूरकडे निघाले होते.

सचिन पवार यांच्यासह बालाजी रावसाहेब दगडे, सचिन बापूराव पवार, गणेश विठ्ठल भोसले, त्यांची बहीण जयर्शी दीपक ढेकणे, भाचा दिग्विजय व एक लहान मुलगी असे सर्वजण दोन मोटारसायकलवरून (एम. एच. 13, ए. एम. 5768 व एम. एच. 14 बी.जी.2860) गावी (गावडी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) निघाले होते. दरम्यान, हॉटेल जंजिराजवळ समोरून येणार्‍या टँकरने ( एम. एच. 12, 6798) मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यात सचिन व दिग्विजय हे दोघे जागीच ठार झाले. अपघातानंतर अन्य नातेवाईक घटनास्थळी जमा झाले. भीषण अपघातामुळे त्या दोघांचा मृत्यू झालेला होता. टँकरचालकाने पलायन केले. या अपघाताची टेंभुर्णी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे अधिक तपास करत आहेत.