आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यात नेऊन ठेवलंय सोलापूर माझं... सर्वत्र खड्डेच खड्डे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातएकही रस्ता असा नाही, जिथे खड्डे नाहीत. सर्वत्र खड्डेच खड्डे. त्यात वाहने धडकतात, धूळ उडते. वाहन चालकांची दमछाक होते. स्वत:ला सावरताना समोरून एखादे वाहन आले की अपघात होईल या भीतीने गाळणच उडते. शहराच्या जवळपास सर्वच भागातील हे चित्र आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने नुसत्या डागडुजीने काम होणार नाही. नव्याने रस्ते करणे हाच पर्याय आहे. परंतु काही ठिकाणी खडी घालून मलमपट्टी करण्याचे प्रकार दिसतात. त्याने तात्पुरती सोय नव्हे; उलट गैरसोय होत आहे. उखडलेल्या खडीवरून वाहने घसरताहेत. वाहनचालक रस्त्यावर आडवे होत आहेत. नोकरदार मंडळी आणि विद्यार्थ्यांची दशा पाहावत नाही अन् सांगताही येत नाही. त्यामुळे रस्ते होणार कधी, हाच प्रश्न आहे.
केबल टाकण्याच्या कामासाठी शहरात सध्या सर्वत्र खोदकाम सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा हे काम सुरू असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. खड्डे आणि धुळीतून वाहनचालक मार्ग काढत आहेत. त्याने ठरलेल्या ठिकाणची कशीबशी ये-जा होते; पण शारीरिक व्याधींचा मोठा प्रश्न आहे. शिवाय वाहनांच्या देखभालीचा प्रश्नही मोठा आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना ज्या काही शारीरिक हालचाली कराव्या लागतात. त्याने पाठदुखीचा आजार होतो. धुळीमुळे श्वसनाचे विकार बळवताहेत. वाहनांचे सुटे भाग झिजत असल्याने त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीवर मोठा खर्च करावा लागत आहे. ही सर्व स्थिती पाहता, वाहने चालवायचे का नाही? असा प्रश्न पडतो. महापालिकेने व्हॉल्वो बस आणली. पण रस्ते काही सुधारले नाहीत. त्यामुळे कुठल्याही वाहनाने जा, खड्ड्यांचा सामना करावाचा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हायकोर्टात याचिका
शहरवासीयांनानागरी सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. गैरसोयींमुळे नागरी जीवितास धोके असतील तर त्याला सर्वस्व पालिकाच जबाबदार असते. मुंबई महापालिका अधििनयमात महापालिका आयुक्तांनाच जबाबदार धरले आहे. मध्यंतरीच्या काळात आयुक्तांच्या विरोधात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्या वेळी आयुक्तांनी सर्व रस्ते मजबूत करणार असल्याचे लेखी पत्र न्यायालयाला दिले. परंतु त्यानंतरही यंत्रणेने गंभीर पावले उचलेली नाहीत.