आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डे बुजवण्यासाठी आठ मक्तेदार नेमणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पावसामुळे शहरात पडलेले खड्डे बुजवणे महापालिकेला शक्य नसल्याने प्रत्येक झोनसाठी एक असे आठ मक्तेदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी शॉर्ट टेंडर काढून खड्डे बुजवण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव नगर अभियंता कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. आयटेम रेटनुसार टेंडर काढण्यात येणार असून, झोननिहाय खड्डे बुजवण्याचा मक्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया करण्यासाठी आयुक्तांची मान्यता गरज असल्याने मान्यतेसाठी आयुक्तांकडे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती उपअभियंता (रस्ते विभाग) संदीप कारंजे यांनी दिली. पावसाची उघडीप पडल्यानंतर खड्डे बुजवण्यात येणार आहे. त्यापूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.