आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाट धुक्यात श्वानांची गणना केलीच कशी? मोकाट कुत्र्यांची मोजणी संशयाच्या भोवऱ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शुक्रवारी सकाळी करण्यात आलेल्या मोकाट कुत्र्यांच्या गणनेवरील संशय आता गडद होत चालला आहे. शुक्रवारी सकाळी शहरात दाट धुके होते. असे असताना गणना केलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गणनेसाठी निवडण्यात आलेली अशास्त्रीय वेळ, त्यावेळी शहरात पसरलेले दाट धुके आणि पिचकारीने रंग मारून मोजणी करण्याऐवजी नजर अंदाजाने मोजणी यामुळे कुत्र्यांची नेमकी संख्या पुढे आली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

आठ झोनमध्ये मिळून हजार २९६ मोकाट कुत्रे निदर्शनास आले. दाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नसताना नजरअंदाजातून गणना करण्यात आली. या गणनेनुसार सर्वाधिक मोकाट कुत्रे प्रभाग क्रमांक २९ मध्ये ३८० तर सर्वात कमी भारतीय चौक, माणिक चौक परिसरातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये ५२ आढळून आले आहेत. ही संख्या चुकीची असल्याचे नगरसेवक अमर पुदाले यांनी म्हटले आहे.
पुन्हा गणना करा, माझ्या प्रभागात ५२ पेक्षा जास्त मोकाट कुत्रे आहेत हे दाखवून देईन, असे ते म्हणाले. आरोग्य निरीक्षकांनी केलेल्या गणनेच्या आधारे हा आकडा आहे, असे स्पष्टीकरण प्रभारी आरोग्य निरीक्षक भूमकर यांनी दिले आहे.