आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफुल भागातील ३५ लाखांच्या रस्त्याची तीन महिन्यांतच दुरुस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -जिल्हावार्षिक योजनेअंतर्गत सैफुल ते जुळे सोलापुरातील मीरा पीठाची गिरणी दरम्यान ३५ लाख रुपये खर्चून ८५० मीटरचा रस्ता करण्यात आला होता. मात्र, तीन महिन्यांतच हा रस्ता खचला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान या रस्त्याच्या कामाचा अहवाल मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मनपा रस्ते विभागाचे उपअभियंता संदीप कारंजे यांच्याकडे मागितला आहे. शिवाय शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या ३३२ कोटींच्या २३ रस्त्यांपैकी ११ रस्त्यांवर असलेल्या त्रुटी दूर करण्याबाबत संबंधित मक्तेदारांना लेखी आदेश देण्यात आलेले आहेत.
रस्त्याचेकाम अर्धवट
शहरातीलअंतर्गत खराब रस्त्याबाबत महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गंभीर भूमिका घेतलेली आहे. सैफुल ते जुळे सोलापूरला जोडणारा ८५० मीटर रस्ता तीन महिन्यांपूर्वी करण्यात आला आहे. बरेच दिवस या रस्त्याचे काम रखडले होते. शिवाय हा रस्ता अर्धवटच आहे रस्ता तयार झाल्यानंतर तीन महिन्यांत रस्त्यावर खड्डे पडले. जलवािहनी टाकताना रस्ता खराब झाल्याचे रस्ते विभागाचे म्हणणे आहे. खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले आहे. पण, तेही व्यवस्थित झालेले नाही.
रस्त्याचे काम खराब
सैफुलते जुळे सोलापूरकडे जाणारा रस्ता तीन महिन्यापूर्वीच करण्यात आला होता. पण तो पहिल्याच पावसाळ्यात खचला आहे. तीन महिन्यांत रस्त्याची दुरुस्ती करावी लागली. यावरून रस्त्याची िस्थती लक्षात येते. संतोषपाटील, नागरिक