आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटींचा रस्ता होत असताना त्याच रस्त्यासाठी लाखो खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ते कंदलगाव रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे काम त्वरित हाती घेण्यासाठी 24 एप्रिल 2014 रोजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यानंतर चारच दिवसांत, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियम धाब्यावर बसवून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आणि 14 मे रोजी याच रस्त्यासाठी 3 कोटी 33 लाख 16 हजार रुपयांचे इ टेंडर काढण्यात आले. या कामात विनाकारण लाखो रुपयांचा फटका सार्वजनिक बांधकाम खात्याला बसला आहे. तीन कोटी खर्चून रस्ता तयार होणार हे आधीच माहीत असतानाही नियम मोडून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवर्‍यात आहे.
मंद्रूप ते कंदलगाव (मोहोळ-विजापूर बाह्यवळण, राज्यमार्ग 149) रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेऊन मलिदा लाटण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचे उघड झाले आहे. इतक्यावर त्यांचे पोट भरले नसून खड्डे बुजवण्याच्या कामातही डांबर न वापरता फक्त मुरूमाने खड्डे बुजवले जात आहेत. कोणीच जाब विचारणारा नसल्यामुळे अधिकारी निर्ढावल्याचे चित्र दिसत आहे