आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलवाटोलवीत गेले सात महिने, सोलापूरकरांच्या माथी खड्डे तसेच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -महाराष्ट्रराज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बांधलेल्या रिंगरुट रस्त्यांच्या दुरुस्तीचा विषय आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मंजूर केला. नंतर महापालिका सभागृहाने त्यात बदल केला आणि आता पुन्हा आयुक्तांचाच विषय सभागृहापुढे आला आहे. या टोलवा-टोलवीत सात महिन्यांचा कालावधी गेला. आजही खड्डे आहे तेथेच आहेत.
खड्ड्यांची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. एकीकडे अवजड वाहने, दुसरीकडे खड्डे अन् महापालिकेकडून रस्त्यांची देखभाल होत नसल्याने झालेली कोंडी या कचाट्यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होताना दिसताहेत.
गुरुनानक नगर ते दयानंद महाविद्यालय हा शहरातील एक प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यांवर दोन मोठी महािवद्यालये आणि बाजारपेठ, दुकाने आणि मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. या रस्त्यांवर ४० पेक्षा जास्त लहानमोठे खड्डे पडले आहेत. गुरुनानक नगर चौकातील खड्ड्याने तर रस्ताच बंद केल्यासारखे चित्र आहे. जुना बोरामणी नाका चौकात, शांती चौकातील स्मशानभूमीसमोर आणि दयानंद महाविद्यालयालगतच्या कृषी कार्यालयासमोरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झाल्याने पाणी साचते. पाऊस झाल्यानंतर दोन, तीन दिवस त्या पाण्याचा निचरा होत नाही. ते पाणी तेथेच थांबून असते.

महापालिकेकडेमाहितीचा अभाव
एमएसआरडीसीच्यापहिल्या टप्प्यात झालेल्या या रस्त्यांची देखभाल महापालिकेने अद्यापही मनावर घेतलेली नाही. कोणत्या रस्त्यावर कुठे खड्डे आहेत याचीच माहिती महापालिकेकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे कामे करण्याचाही प्रश्नच येत नाही, असे महापाकिलेच्या कारभारातून समोर येऊ लागले आहे. राज्य शासनाने पावसाळ्यापूर्वी खड्डे दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आदेश दिले होते. तो न्यायालयाच्या निर्णयानंतर झाला होता. त्यासाठी दरवर्षी फेब्रुवारीचा कालावधीही दिलेला आहे. पण, त्याची अंमलबजावणी महापालिका करीत नाही.
आणखी १२ कोटी
नगरोत्थानमधून१७ कोटी रुपयांचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यात व्हीआयपी रस्ता, पार्क चौक ते पंचकट्टा याचाही समावेश आहे. सम्राट चौक ते मोदी पोलिस चौकीपर्यंतचा रिंगरूटसाठी आणखी १२ कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रस्ताव पाठविला आहे.” गंगाधरदुलंगे, प्रभारीनगरअभियंता
विषय पुन्हा आला

मार्चमहिन्यात या रस्त्यांच्या कामांना मंजुरीसाठीचा प्रस्ताव सभागृहापुढे पाठविला होता. पण नंतर सभागृहाने तो बदलून टाकला. काही रस्ते वगळले गेले. ते काय आणि कसे झाले माहिती नाही. पण आता पुन्हा १७ कोटी रुपये खर्चाचा विषय आला आहे.” चंद्रकांतगुडेवार, आयुक्त,महापालिका

येत्या सभेत मंजुरी
सुमारे१७ कोटी रुपयांची तरतूद केली. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी डीपीसी महापालिका प्रत्येकी ५० टक्के असा एकूण १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आयुक्त नसल्याने विषय रखडला होता. येत्या सभेत या विषयाला मंजुरी दिली जाईल.” अलकाराठोड , महापौर,सोलापूर
दुरुस्तीचा आला पुन्हा प्रस्ताव
मार्चमहिन्यात या रस्त्यांच्या कामांसाठीचा प्रस्ताव तयार झाला. हे काम करण्याचेही ठरले. तसा प्रस्ताव आयुक्तांनी सभागृहापुढे पाठविला. नंतर त्यावरही महापालिकेत राजकारण झाले. मनपातील नेत्यांनी त्या ठरावात बदल केला. त्यानंतर आयुक्तच महापालिकेत नव्हते, या सर्व घडामोडीत सात महिने लोटले. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या दुरुस्तीचे काहीही देणे घेणे नसल्यासारखे राजकारण मनपात झाले. आता पुन्हा तोच प्रस्ताव २६ ऑगस्टच्या सभागृहापुढे आला आहे. या टोलवाटोलवीत सात महिने गेले, त्याचे ‘उत्तर’ मात्र कोणाकडेच नाही.