आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीमुळे सोलापुरात चोरी उघडकीस; एकाला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गोल्डफिंचपेठ येथील सिटीप्राईड दुकानात अकरा मोबाइल चोरणारा चोरटा फौजदार चावडी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. राजू जाधव (वय 40, रा. सेटलमेंट कॉलनी) याला मंगळवारी अटक झाली असून त्याच्या पत्नीला अटक झाली नाही.

गायकवाड पती-पत्नी मिळून 16 सप्टेंबर रोजी दुकानात बल्ब घेण्यासाठी गेले. कैलास कोठारी यांची नजर चुकवून त्यांनी अकरा मोबाईल पळविले होते. हे दृश्य दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले होते. 21 सप्टेंबर रोजी फिर्याद दिल्यानंतर फौजदार दत्ता शिंदे, हवालदार संजय मोरे, मच्छिंद्र जाधव, अप्पा पवार, राजकुमार तोळणुरे, बंडू पवार, लक्ष्मण खरात या पथकाने सीसीटीव्हाचा आधार घेऊन तपास सुरू केल्यानंतर जाधव याचे नाव समोर आले होते. अकरा मोबाइलही जप्त केल्याची माहिती र्शी. शिंदे यांनी दिली.

आरटीओमध्ये फॉर्म चोरी
आरटीओ कार्यालयातील लायन्स विभागातील फॉर्म चोरीला गेले आहेत. 2010 ते चार सप्टेंबर 13 या कालावधीतील ही घटना आहे. नागनाथ काळे यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे.