आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery At Solapur, Ex Mayer Beemrao Jadhav's House

दरोडेखोरांच्या हाताचे ठसे मिळाले; भारत जाधव यांचे रिव्हॉल्व्हर चोरट्यांच्या ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माजी महापौर भीमराव जाधव यांच्या घरातील दरोडाप्रकरणी पोलिसांना दरोडेखोरांच्या हाताचे ठसे मिळाले आहेत. चार वेगवेगळे पथक तयार करून शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक वसंतराव गायकवाड यांनी दिली. गुरुवारी पहाटे दरोडा पडल्यानंतर सहा वाजता जाधव कुटुंबियांनी पोलिसांना दरोड्याची माहिती कळवली. पोलिसांनी पंचनामा केला. अकरानंतर पोलिसांनी फिंगर प्रिंट पथक आणि श्वान पथकास बोलावले. यामध्ये फिंगर पिंट्र पथकास दोन ठसे मिळाले आहेत. तसेच दरोडेखोरांनी ज्या दिशेने पलायन केले, ती दिशा श्वानाने दाखवली.
रिव्हॉल्व्हर हातात असती तर..
माजी नगरसेवक भारत जाधव यांनी आपल्या सुरक्षेसाठी मेड इन इंडियाचा ए-2280/05 या क्रमांकाचा रिव्हॉल्व्हर घेतला होता. दररोज ते आपल्या उशीखाली ती रिव्हॉल्वर घेऊन झोपतात. जेव्हा दरोडा पडला तेव्हा त्या रिव्हॉल्व्हरमध्ये चार जिवंत काडतुसे होती. त्यांनी रिव्हॉल्व्हर घेण्यापूर्वी दरोडेखोरांनी ती रिव्हॉल्व्हर घेतली. ती जर भारत जाधव यांच्या हाती आली असती तर त्यांनी फायरिंग केले असते आणि कदाचित हा अपघात टळला असता.
भीमरावांच्या खोलीतही चोरट्यांचा वावर, दोघांनाही डांबले
माजी महापौर भीमराव जाधव यांना कमी ऐकू येतो. त्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम पळवली. तोपर्यंत त्यांना जाग आलीच नाही. जेव्हा ते तीन वाजण्याच्या सुमारास बाथरूमला जाण्यासाठी उठले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला हाक दिली. परंतु दोघांनाही दरोडेखोरांनी बेडरूममध्ये डांबून ठेवल्यामुळे बेडरूममधूनच त्यांनी एकमेकांशी जोरजोरात संवाद साधला.
पेट्रोलिंग असतानाही पोलिसांसमोर आव्हान
मध्यरात्री एक ते तीनच्या सुमारास पोलिसांचे पेट्रोलिंग सुरूच असते. तसेच ज्या भागात लांब लांब घरे आहेत त्या भागात पेट्रोलिंगसाठी विशेष लक्ष दिले जाते. दरोड्याची वेळ सुध्दा अडीच ते पावणेतीन अशीच होती. त्यासाठी पोलिसांना पेट्रोलिंग करताना हे दरोडेखोर आढळले नाही का अशा मुद्यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर एक मोठे आवाहनच निर्माण झाले आहे.
वॉचमन आमीर शेखने केली पिता, पुत्राची सुटका
दरोडेखोरांनी अवघ्या पंधरा मिनिटांत ऐवज लुटल्यानंतर त्यांनी आम्ही वरच्या मजल्यावर आहोत असे सांगून बेडरूमचा दरवाजा बंद करून किचनच्या दरवाज्यातून पसार झाले. दरोडेखोर वरच्या मजल्यावरच असतील या विचाराने भारत जाधव आपल्या बेडरूममध्ये अर्धा तास शांत बसले. यानंतर जेव्हा त्यांना दरोडेखोर पळाल्याचा अंदाज आला तेव्हा त्यांनी आपल्या आमिर शेख या वॉचमनला हाक दिली. परंतु तो बाजूच्या सांस्कृतिक भवनच्या कार्यालयात झोपी गेल्यामुळे उठू शकला नाही. पावणेतीन ते साडेपाच पर्यंत जाधव यांनी हाक दिली. साडेपाच वाजता त्याला जाग आली आणि त्याने बेडरूमचे दरवाजे उघडून सर्वांना बाहेर काढले. मोबाइलही दरोडेखोरांनी घेतल्यामुळे जाधव यांनी शेख यास पोलिस ठाण्यात पाठवून दिले.
मराठी, हिंदीतून बोलत होते
दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांनी भारत जाधव यांच्याशी मराठीतून संवाद साधला. ते एकमेकांशी हिंदी भाषेत बोलत होते. परंतु त्यांची भाषा तोडकी मोडकी होती. ते एकमेकांना सफरचंद, मोसंबी, लिंबू या नावाने हाक मारत होते.
तोंडाला रूमाल
दरोड्यासाठी आलेले दरोडेखोर हे काळे कपडे परिधान केले होते. तसेच तोंडाला रूमाल बांधला होता. तसेच ते सर्वजण वीस ते पंचवीस वयोगटाचे होते.
15 मिनिटांत पसार
पहाटे 2.30 वाजता दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. 2.45 वाजता ते पसारही झाले. आठ जणांनी अवघ्या पंधरा
मिनिटांत डाव साधला.
बेडरूम बाहेरून बंद होती. वडिलांना मी भेटू शकत नव्हतो आणि वडिलांचाही आवाज येत नव्हता. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो. जेव्हा वडिलांनी मला हाक मारली तेव्हा समाधान वाटले. रिव्हॉल्व्हर जर माझ्या हातात आली असती तर मी निश्चितच फायरिंग करून दोघा तिघांना मारले असते. भारत जाधव, माजी नगरसेवक
असा होता ऐवज
1.30 लाख सोन्याचे 65 ग्रॅम वजनाचे लॉकेट.
1 लाख सोन्याचे 502 ग्रॅम वजनाचे ब्रासलेट.
4 लाख सोन्याचे कंगण.
40,000 सोन्याचे 20 ग्रॅम वजनाचे लॉकेट.
40,000 सोन्याचा 20 ग्रॅम लक्ष्मी हार.
60,000 सोन्याचे 30 ग्रॅम वजनाचे गंठण.
40,000 सोन्याची 20 ग्रॅमची सोनसाखळी.
1 लाख सोन्याचा 50 ग्रॅम वजनाचा पोहे हार.
40,000 सोन्याचे 20 ग्रॅमचे मणिमंगळसूत्र.
60,000 तीन सोन्याच्या 10 ग्रॅमच्या अंगठय़ा.
1 लाख दोन सोन्याच्या 50 ग्रॅमच्या पाटल्या.
1.60 लाख सोन्याच्या 20 ग्रॅम वजनाच्या बांगड्या.
20,000 दोन जोड सोन्याच्या 10 ग्रॅम वजनाचे कर्ण फुले.
20,000 दोन नग सोन्याच्या 5 ग्रॅमच्या अंगठय़ा
50,000 रिव्हॉल्व्हर.
4.68 लाख रोख रक्कम