आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात पंजाब नॅशनल बँक फोडण्याचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सम्राट चौक परिसरातील पंजाब नॅशनल बँक फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. याबाबत गुरुवारी दुपारी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेचे सिनियर मॅनेजर लक्ष्मीकांत प्रभाकर देशपांडे यांनी फिर्याद दिली.

बँकेचा एक दरवाजा कस्तुरबाई भाजी मंडईच्या आतील बाजूस निघतो. तो दरवाजा कायमचा बंद असतो. चोरट्याने लोखंडी शटर आणि लोखंडी गेट तोडून लाकडी दरवाजाची फळी काढली. यातून दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने बँकेत प्रवेश केला. यानंतर बँकेची तिजोरी तोडण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बँक उघडल्यानंतर चोरीचा प्रकार बँक कर्मचार्‍यांच्या लक्षात आला. त्यावेळी त्यांनी बँकेचे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला. बँकेचे मॅनेजर देशपांडे यांनी त्वरित बँक गाठली. याबाबत जोडभावी पेठ पोलिस चौकीत गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास फौजदार व्ही. व्ही. बोधे करीत आहेत.