आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळे सोलापुरातील एका अभियंत्याचे घर फोडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ज्ञानेश्वर नगरमधील मुक्तेश्वर सोसायटीत एका घराचा दरवाजा उचकटून चोरांनी तोळे दागिने, दीड लाखाची चांदीची भांडी असा ऐवज पळवून नेला. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घरातील सदस्य घरात झोपलेले असताना चोरीची घटना घडली आहे.

मुक्तेश्वर सोसायटीतील अभियंता महेश केसकर यांच्या घरात ही चोरी झाली. विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. केसकर हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. घरातील सर्व सदस्य घरात होते. चोरटे चोरी करून गेल्यानंतर पहाटे हा प्रकार लक्षात आला. मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठ्या, गंठण असे एकूण पाच तोळे दागिने, दीड लाख रुपये, वीस हजार किंमतीचे चांदीचे दागिने असा ऐवज चोरीस गेला आहे. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, निरीक्षक बाळकृष्ण साळुंखे हे घटनास्थळी आले. श्वानपथक काही अंतरावर जाऊन थांबले. फिंगर प्रिंट मात्र मिळाले नसल्याचे श्री. साळुंखे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...