आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्‍ये बसमधून 45 हजार रोख आणि एक लाखांचा ऐवज पळवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एसटी बसमधून प्रवास करताना रॅकवर ठेवलेली बॅग चोरांनी पळविली. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला घडली. श्रीकृष्ण गायकवाड (रा. अंत्रोळीकरनगर भाग दोन, होटगी रोड) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. पंचेचाळीस हजार रुपये, लॅपटॉप, सीडी रायटर, हार्डडिक्स, एटीएम कार्ड, एनटीपीसी कंपनीचे ओळखपत्र असा सुमारे एक लाखाचा ऐवज असलेली बँग चोरांनी हातोहात पळवली आहे.

गायकवाड हे बार्शी तालुक्यातील सौंदणे गावात जाण्यासाठी बसमध्ये बसले होते. रॅकवर त्यांनी बॅग ठेवली होती. बार्शी येथे उतरल्यानंतर त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. नेमकी बॅग सोलापूर ते बार्शी या मार्गावर प्रवास करताना कुठे चोरीला गेली हे निष्पन्न झाले नाही. हवालदार पंडित जाधव तपास करीत आहेत.

जुळे सोलापुरात लाखाची घरफोडी
जुळे सोलापुरातील चंदननगरात राहणारे अमितरेड्डी सिद्रामरेड्डी सालोटगी यांच्या घरात चोरी झाली. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमाराला उघडकीस आली. विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. लॅपटॉप, अर्धा तोळे झुबे, चांदीची समई, दोन मोबाइल, वीस हजार रुपये असा एक लाखाचा ऐवज चोरीस गेला आहे. घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूमच्या कपाटातील दागिने, पैसे चोरांनी पळवले.

सिद्धेश्वर पेठेत चोरीचा प्रयत्न
सिद्धेश्वर पेठेत सुषमा विजयकुमार मोरेश्वर यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. जेल रोड पोलिसात त्यांनी फिर्याद दिली आहे. कडीकोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. चोराच्या हाती काही लागले नाही.

अडीच तोळ्यांचे दागिने चोरीला
वसंतराव नाईक प्रशालेजवळील बाळ गल्लीत राहणारे आयेशा शकील खान यांच्या घरात चोरी झाली. दोन दिवस त्या परगावी गेल्या होत्या. रविवारी सकाळी आल्यानंतर घराचा मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. कपाटातील एक तोळ्याचे बोरमाळ, एक तोळे मंगळसूत्र, पाच ग्रॅम कर्णफुले, पंधरा तोळे पैंजण, तीन हजार असा ऐवज चोरीस गेला आहे. सदर बझार पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

चोर्‍या कधी थांबणार?
घरफोड्यांचे सत्र कायम असून पोलिस चोरांना शोधण्यात अपयशी ठरत आहेत. या घटना कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रात्रगस्त, बीटमार्शल पथक, गुन्हे शाखेचे पथक काय काम करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.