आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोणार्क’वर दरोडा; दोन लाखांची लूट, जनरल डबा वार्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोमवारी पहाटे भाळवणी रेल्वे स्थानकजवळ बाह्यभागात (आऊटरवर) मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस उभी असता अज्ञात दरोडेखोरांनी सर्वसाधारण डब्यात घुसून दरोडा घातला. इंजिनपासून पहिला असलेल्या सर्वसाधारण डब्यात प्रयत्न झाला. दरोडेखोरांकडून वारंवार सर्वसाधारण डब्यातील प्रवाशी लक्ष्य होत असल्याने तो डबा वार्‍यावर सोडला आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

रविवारी रात्री ढवळस स्थानकजवळ बाह्यभागात (आऊटरवर) क्रॉसिंगसाठी ‘कोणार्क’ला 45 मिनिटे थांबवले होते. त्यानंतर गाडी भाळवणी स्थानकजवळ बाह्यभागात (आऊटरवर) उभी असता अंधारचा फायदा घेत दरोडेखोर सर्वसाधारण डब्यात घुसले. डब्यातील प्रवाशांच्या सामानाची लूट करून त्यांनी पोबारा केला. शस्त्राचा धाक दाखवत प्रवाशांकडून सामान हिसकवले. यात श्रीदेवी बसवंती (वय 29, मगर पट्टा, पुणे), मुक्ता बालाजी अलगुंडे (वय 25, रा. पुणे) व संदीप विक्रम गोरजे (वय 19, रा. पुणे) यांच्या जवळचे सामान दरोडेखोरांनी लुटले. या लुटीत श्रीदेवी यांच्या हातातील बांगड्या, मंगळसूत्र व उर्वरित सामान पळवले. तसेच संदीप याच्याकडून रोख पाच ते सहा हजार रुपये व एटीएम कार्ड लुबाडले. याची अंदाजे रक्कम दीड ते दोन लाख होते. विशेष म्हणजे, या दोन महिला पहाटे सव्वादोनच्या सुमारास लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाले असता त्याची नोंद डायरीत कुठेच नाही. तसेच रेल्वे पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. या गाडीस पोलिस संरक्षण असतानाही दरोडा पडतोय यावरून प्रवाशांची सुरक्षा कितपत योग्य आहे हे समजते.