आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक लाखाची घरफोडी; अन्य गुन्ह्यातील दोन चोर सापडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाळे येथील सर्मथनगरात राहणारे विनायक पोपट धुळम यांच्या घरात चोरी झाली. सोमवारी सकाळी आठच्या सुमाराला हा प्रकार उघडकीस आला. सोने, चांदीचे दागिने, एलसीडी, दोन गॅस टाक्या चोरीस गेल्या आहेत. धुळम रविवारी सायंकाळी परगावी गेले होते. साहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश हांडे तपास करत आहेत.

चोर अटकेत; ऐवज जप्त
राहुल गांधी झोपडपट्टी परिसरातील अयुब हुसेन शेख यांच्या घरात झालेली चोरी उघडकीस आली आहे. सद्दाम अ. गफूर शेख (वय 20, रा. राहुल गांधी झोपडपट्टी) याला अटक झाली आहे. सोन्याचे गंठण, पैसे, चांदीचे दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयित शेख याला दारू, जुगाराचे व्यसन होते. पैशाची चणचण असल्यामुळे त्याने चोरी केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आल्याचे जेल रोडचे साहायक पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी सांगितले. त्यांच्यासह फौजदार सांगळे, साहायक फौजदार अनिल लंकेश्वर, हवालदार खरटमल, मदन गायकवाड, सोमनाथ चव्हाण, ओमप्रकाश मडवळी, गोविंद राठोड, नागनाथ ननवरे, अस्लम सय्यद, बाळासाहेब कोबरणे, सुहास गायकवाड, मुस्ताक नदाफ, सनी गोरलेवाले, तिमीर गायकवाड, बागवान या पथकाने त्यालाअटक केली.

घरफोडी चोरास अटक
घरफोडीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मेहबूब चांद पटेल (वय 24, रा. मराठावस्ती, शिवगंगा मंदिराजवळ) याला सोमवारी अटक झाली आहे. दीड तोळे सोन्याचे लगड, मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई फौजदार गोविंद आदटराव आदींनी केली.