आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगराजनगरात दोन घरफोड्या; पंधरा तोळे दागिने पळवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापुरात चोर्‍यांचे सत्र सुरूच असून रंगराजनगरात दोन घरफोड्या झाल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये पंधरा तोळे सोने, पाऊणलाख रुपयेचोरीला गेला आहे.

न्यू रंगराजनगर दासरी शाळेजवळ राहणारे र्शीनिवास कुणीगिरी यांच्या घरात चोरी झाली आहे. साडेतीन तोळ्याचे चपलाहार, अर्धा तोळे कर्णफुले (डायमंडसह), एक तोळे कर्णफुले असा पाच तोळे ऐवज चोरीस गेला आहे. र्शीनिवास हे पुतण्याच्या बारशाला तुळजापूरला गेले होते. मुख्य दरवाजा कडीकोयंडा उचकटून कपाटातील दागिने चोराने पळविले आहे. गुरुवारी दुपारी दीड ते शुक्रवारी सकाळी साडेसात या दरम्यान घर बंद होते. सकाळी ते घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

दुसर्‍या घटनेत मशाक बागवान (रा. बागवान कॉम्प्लेक्स, रंगराजनगर) यांच्या घरात अकरा तोळे दागिन्यांची चोरी झाली आहे. वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या दरम्यान ते सिंदगी (कर्नाटक) येथे कार्यक्रमासाठी गेले होते. 74 हजार रुपये रोख, पाच तोळे पाटल्या, दीड तोळे लॉकेट, तीन तोळे अंगठय़ा (चार नग), चांदीचे पैंजण असा ऐवज चोरीस गेला आहे. परिवारासह ते सिंदगी येथे वास्तुशांती कार्यक्रमास गेले होते. कडीकोयंडा तोडून कपाटातील दागिने व पैसे चोराने पळवले आहे. या दोन्ही घटनांची फिर्याद एमआयडीसी पोलिसात देण्यात आली आहे.