आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला भेटायला गेले; इकडे चोरांनी काम फत्ते केले, नई जिंदगी परिसरात घरफोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुलीला भेटण्यासाठी गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी साधून चोरांनी घर फोडले. आठ तोळे दागिने सात हजार रुपये लंपास झाले आहेत. सिकंदर इनामदार (रा. भीमाशंकर नगर, नई जिंदगी) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
इनामदार बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांची मुलगी राहते. त्यांना भेटण्यासाठी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला गेले. सकाळी सातच्या सुमाराला घरी आल्यानंतर मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. लोखंडी कपाट कटावणीने तोडून आठ तोळे दागिने नेले. त्यात एकतोळे बोरमाळ, दीड तोळे गंठण, एक तोळे टॉप्स, दीड तोळे अंगठ्या, एक तोळे नेकलेस, झुमके, कानातील फुले झुमके असे दागिने होते. सातहजार रुपये होते. हा ऐवज चोरांनी नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पथक आले. ठसे घेतले आहेत. तपास सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.
मंगळसूत्र हिसकावले
रेल्वेस्टेशनजवळील चांदणी चौकातून भाजी आणण्यासाठी जाताना महालक्ष्मी चिंचोरे (रा. रेल्वे लाइन, सोलापूर) यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण हिसकावण्यात आले. सौ. चिंचोरे शिक्षिका आहेत. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजी आणण्यासाठी दुचाकीवरून जाताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन तरुणांनी दागिने हिसकावले. सदर बझार पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत विजापूर रस्त्यावरील उत्कर्षनगरातून दुचाकीवरून जाताना वासंती कुलकर्णी (रा. इंदिरानगर) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनीहिसकावून नेले. काळ्या रंगाच्या पल्सर वर ते आले होते. मागील पंधरवड्यात उत्कर्षनगरातच एका महिलेचे गंठण हिसकावण्यात आले होते. शनिवारी एका तासाभराच्या अंतराने चांदणी चौक उत्कर्षनगरातून मंगळसूत्र हिसकाण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. चांदणी चौक विजापूर रोड या दोन्ही गुन्ह्यात चोरांनी वापरलेली दुचाकी एकच असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आल्याचे सांगण्यात आले