आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊण लाखांचे दागिने चोराने केले लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुनी मिल आवारातील उमानगरीत राहणारे रवींद्र मलकापल्ली यांच्या घरात चोरी झाली. फौजदार चावडी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अडीच तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने चोरीस गेले आहेत. घराचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील दागिने चोरून नेले. फौजदार सुनील खटाणे तपास करीत अहेत.

मुलीस तरुणाने पळवून नेले
परीक्षाअसल्यामुळे आईने आपल्या मुलीला परीक्षा केंद्गावर नेऊन सोडले. यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. प्रसाद सज्जन (रा. शिक्षक हौसिंग सोसायटी, सोलापूर) याच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमाराला ही घटना उघडकीस आली. महिला फौजदार पाटील तपास करीत आहेत.

अपहार;लिपिकावर गुन्हा
महापालिकेतीलवसुली लिपीक संजय जगताप (रा. भीमनगर, तळेहिप्परगा) यांच्यावर ४५ हजार रुपयांचा गैरव्यवहार करून अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप थडसरे यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. ते १६ जानेवारीदरम्यान हा प्रकार घडला. संजय हे वसुली विभागात लिपिक आहेत. नागरिकांकडून वसूल केलेले पैसे मनपात जमा करता अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.