आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच ठिकाणी घरफोडी: दीड लाखाचा ऐवज गायब; दोन महागडे मोबाइल पळवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरमरिआई चौक, डी-मार्टजवळ, सिंधूविहार, कीिर्तनगर, शिवगंगानगर भागात चोऱ्या, घरफोड्या झाल्या आहेत. दोन महागडे मोबाइलही पळवण्यात आले आहेत. सुमारे दीड लाखाहून अधीक ऐवज चोरीस गेला आहे.
पहिलीघटना : अककलकोटरस्ता कीर्तिनगर येथे राहणारे शरणबाई भरमशेट्टी यांच्या घरात चोरी झाली. एमआयडीसी पोलिसात त्यांनी फिर्याद दिली आहे. तीन तोळे सोन्याचे दागिने त्यात अंगठी, लहान मुलांचे अंगठ्या, चांदीचे पैंजण, पंचपाळ, चांदीचे पूजेचे साहित्य असा एकूण ९० हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे.
दुसरीघटना : सिंधुविहारजवळमोबाइलवरून बोलत जताना दोघा तरुणांनी दुचाकीवरून येऊन बारा हजार किमतीचा मोबाइल घेऊन पळून नेलाे. मंगेश साठे (रा. बनशंकरीनगर) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री ते मोबाइलवरून बोलत चालत जाताना दोघा तरुणांनी हा प्रकार केला होता.
तिसरीघटना : डी-मार्टजवळीलभाजी मार्केटमध्ये भाजी घेताना सचिन कंदले (रा. अभिषेक कॉम्प्लेकस, जनता बँकेजवळ) यांच्या खिशातील २२ हजार किमतीचा मोबाइल चोरीस गेला. विजापूर नाका पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे.
चौथीघटना : कमलअग्रवाल यांच्या स्वीट मार्ट दुकानातून गॅस टाकी पैसे चोरीला गेले आहेत. सोमवारी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना मरिआई चौकात घडली. पाचवीघटना : रेश्माकादगी (रा. शिवगंगानगर भाग चार) यांच्या घरात चोरी झाली आहे. एमआयडीसी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. सोन्याचे दागिने पैसे असा एकूण ३० हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे.