आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्या, घरफोड्या, दरोड्यात सुमारे २१ तोळे सोने लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातमंगळवारचा दिवस जणू चोरांचा ठरला. दोन घरफोड्या, तीन ठिकाणी मंगळसूत्र पळवण्याची घटना घडली. सर्वात भीषण प्रकार बाळ्याजवळील गजाजन पार्कमधील होता. तिथे सुमारे १५ दरोडेखोरांनी तलवारी घेऊन धुडघूस घातला. या सर्व घटनांमध्ये सुमारे २१ तोळे सोने चोरांनी लंपास केले. घरफोड्यांत सुमारे एक लाखांचा ऐवज गेला.

गजानन पार्कमध्ये शिक्षक संदीप वेदपाठक यांच्या घरातून सात तोळे दागिने, दहा हजारांची रोकड दरोडेखोरांनी पळवली. ते घरात एकटेच होते. खिडकी फोडण्याच्या प्रयत्नात झालेल्या आवाजामुळे वेदपाठकांना जाग आली. दरवाजा उघडून मदतीसाठी हाक देण्याच्या प्रयत्नात तलवारीने वार झाल्याने अर्धा दरवाजा तुटला. ते मदत घेण्यासाठी गच्चीवर धावले. तिथे चौघे दरोडेखोर आधीच होते. त्यांना मारहाण करत बेडरूमध्ये आणले आणि बेडवर झोपवून उलट्या तलवारीने मारहाण केली. तेथील बाथरुममध्ये कोंडले. तिजोरी फोडून दागिने, पैसे नेले. हा थरारक आणि भीतीदायक प्रकार सुमारे अर्धा तास सुरू होता.
पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर अनेक वेळ फोनच उचलला नाही. बाळेतील त्यांच्या भावाला फोन करून बोलावून घेतले. दीड वाजता फोन घेतल्यानंतर पोलिस मध्यरात्री अडीचच्या सुमाराला आले. सकाळी परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेतानाही रहिवासी भेदरलेल्या स्थितीत दिसले.
बाळेपासून तीन किलोमीटर अंतरावर शिवाजीनगर आहे. त्याच्यासमोरील बाजूला मुख्य महामार्गावरून आठशे मीटर अंतरावर गजानन पार्क, पदमावती पार्क आहे. दहा वर्षापूर्वी ही वसाहत उभारली असून सुमारे ३० परिवार येथे राहतात. चोहोबाजूला मोकळे मैदान, शेती, कॅनॉल आहे. वेदपाठक हे डफरीन चौकातील एका इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षक आहेत. आई, वडील, पत्नी एका कार्यक्रमानिमित्त दोन दिवसांपूर्वी पुण्याला गेले होते. त्यामुळे ते एकटेच होते. ही संधी दरोडेखोरांनी साधली.

तीनघटनांमध्ये सुमारे १४ तोळ्यांचे मंगळसूत्र, गंठण चोरांनी पळवले. पंधरा मिनिटांत दोन तर दोन तासांनी एक अशा घटना घडल्या. दुपारी पावणेदोनच्या सुमाराला भवानी पेठेतील श्रीशैलनगरातून पायी जाताना रेणुका मल्लिकार्जुन खानापुरे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण हिसकावले. पंधरा मिनिटांच्या अंतराने बलिदान चौकात विद्या अशोक चव्हाण यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे चपलाहार हिसकावण्यात आला. त्याचा काही भाग चोरांच्या हाती लागला. याबाबत जोडभावी पोलिसात फिर्याद देण्यात आली.
जुळे सोलापुरातील अष्टविनायकनगर येथे अश्विनी प्रदीप शिंदे (रा. बंडे संकुल, जुळे सोलापूर) पायी जात होत्या. समोरून दुचाकीवर आलेल्या तरुणाने अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले. त्यातील निम्मा भाग चोरांच्या हाती लागला. त्या सदगुरू बैठकीस जाताना ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रिक्षातमंगळसूत्र चोरले
रंगभवनते एस.टी. स्टॅड या दरम्यान रिक्षातून प्रवास करताना शिवाजी पिराजी सोलनकर (रा. हंजगी, ता. अक्कलकोट) यांच्या पर्समधून तीन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. ही घटना ११ आॅक्टोबर रोजी घडली. बुधवारी फौजदार चावडी पोलिसांनी फिर्याद िदली आहे.
सैफुलपरिसरात घरे फोडली
जनताबँक सैफुल कॉलनीत राहणारे विनायक आमले यांच्या घरात चोरी झाली. कडीकोयंडा उचकटून कपाटातील दीड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, अंगठी, बदाम तसेच टीव्ही, मोबाइल असा ऐवज चोरीस गेला आहे. या घरापासून काही अंतरावर राहणारे जुबेर इनामदार (रा. मिल्लतनगर) यांच्या घरातही चोरी झाली. पैसे, दागिने चोरून नेण्यात आले आहे. दोन्ही घटनांमध्ये पन्नास हजारांचा ऐवज गेला. विजापूर नाका पोलिसात फिर्याद आहे. गणेशनगर तांडा येथील महावितरण कंपनीच्या डीपीतून वायरिंग कीट चोरीला गेले आहे. त्याची किंमत पन्नास हजार रुपये आहे. १६ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. दत्तात्रय डोके यांनी सलगरवस्ती पोलिसात फिर्याद आहे
बंडगर यांच्या घरी लग्न आणि चोरीचा प्रयत्न!

वेदपाठकयांच्या शेजारी समाधान बंडगर राहतात. त्यांच्याकडे गुरुवारी िववाह असल्याने घरी नातेवाइकांची गर्दी होती. त्यांची खिडकी फोडण्याचा प्रयत्न केल्याने बंडगर जागे झाले. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला. मागील दरवाजाने मदत घेण्याचा प्रयत्न केला असता ितथूनही चोरांनी हल्ला केला. दरवाजा काही उघडला गेला नाही. मंडपातील हॅलोजन दिवा फोडला. आरडाओरडमुळे शेजारी जागे झाले. कंटेकर कचरे मदतीसाठी बाहेर आल्यानंतर त्यांनाही मारहाण झाली. कंटेकर यांना खाली पाडून उलट्या तलवारीने पायावर, मांडीवर मारले.