आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 तासांत 6 तोळे दागिने पळवले; व्यापार्‍याचे घर लुटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नातेवाइकाच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे परिवारासह जेवायला गेल्यानंतर अवघ्या तीन तासांत चोरांनी घरातील सहा तोळे दागिने पळविले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला उघडकीस आली. शंतनू कोर्टीकर (रा. स्वामी विवेकानंदनगर, सैफुल) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांचा विजापूर रस्त्यावर व्होडाफोन शोरूम आणि कुरिअरचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारी साडेबाराला ते जेवायला जाऊन घरी आल्यानंतर मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून बेडरूमधील कपाट कटावणीने उचकटले. त्यातून चार तोळे गंठण, दोनतोळे (प्रत्येकी एक तोळा) अंगठय़ा, विदेशी बनावटीचा महागडा कॅमेरा, दहा हजार रुपये, मोबाइल असा ऐवज चोरीस गेला आहे. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर श्वानपथक आणले. विजापूर रोडहून सोरेगावच्या दिशेपर्यंत जाऊन थांबले. कुणी तरी पाळत ठेवूनच चोरी केल्याचा संशय पोलिसांचा आहे.

दुसरी घटना : न्यायालयाजवळून पायी जाताना अमर अशोक माने (रा. सिद्धार्थनगर) यांना मारहाण करून तीन तोळे (तीन अंगठय़ा) व आठ हजार रुपये काढून घेतले. चौघा तरुणांवर जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. चौघेजण दुचाकीवर आले होते. त्यापैकी अँक्टिव्हा (एमएच 13 बीएस 6562) चोरांकडे होती. मनोज निकम असे नाव एका चोराने घटनेदरम्यान बोलताना घेतले होते. लाथाबुक्यांनी मारहाण करून मानेजवळील दागिने पैसे काढून घेतले. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमाराला ही घटना घडली आहे.

तिसरी घटना : जोडभावीपेठेतील गोपाळ श्रीकांत कन्ना यांच्या घरात चोरी झाली. दीड तोळे तीन अंगठय़ा (प्रत्येकी अर्धा तोळे), दीड तोळे गंठण, पैसे, मोबाइल, बँकेचे पासबुक, ओळखपत्र, कपाटाची चावी, गाडीची चावी चोरीस गेली आहे. शनिवारी रात्री सात ते रविवारी सकाळी नऊपर्यंत हा प्रकार घडला. कन्ना यांचे घर उघडेच होते. दरम्यान, हा प्रकार घडला आहे. जोडभावी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी
शहरात अलीकडे चोर्‍यांचे सत्र वाढले आहे. पोलिसांचे विशेष पथकही चोरांच्या मागावर असूनही ते हाती लागत नाहीत. रात्रीच्या वेळी गस्त सुरू आहे. दिवसाही चोरीच्या घटना होत आहेत. नागरिकांनी सावध राहावे. दागिने, पैसे घरात ठेवून जाताना काळजी घ्यावी.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त, सोलापूर