आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारहणीच्या निषेधार्थ आरटीओ कार्यालयात लेखणीबंद आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुणे आरटीओ कार्यालयातील परवाना विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक डी. पी. थोरात यांना बुधवारी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून झालेल्या मारहाणीचा निषेध करत प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवारी सोलापूर कार्यालयात एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन केले. या आंदोलनात सर्व कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असल्याने आरटीओ कार्यालयाचे कामकाज दिवसभर बंद होते.

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयीन कर्मचार्‍यांवर मागील काही महिन्यांपासून वारंवार हल्ले होत आहेत. यापूर्वी नांदेड येथेही असेच हल्ले झाले. पुण्यातही आरटीओ कर्मचार्‍यांना नाहक लक्ष्य करत त्यांना मारहाण करण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय संघटनांच्या वतीने गुरुवारी राज्यात एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.

यावर झाला परिणाम
सोलापूर कार्यालयातून रोज सरासरी दोनशे ते अडीचशे शिकाऊ वाहन परवाना दिला जातो. तर सरासरी शंभर ते दीडशेच्या प्रमाणात पक्का परवाना तसेच वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. गुरुवारी यातले एकही काम झाले नाही.